Sandeep Reddy Vanga On Javed Akhtar Saam Tv
मनोरंजन बातम्या

'Mirzapur'च्या वेळी तुमच्या मुलाला सल्ला का दिला नाही?, 'Animal' वर टीका करणाऱ्या जावेद अख्तर यांना संदीप रेड्डी वंगाचा सवाल

Javed Akhtar On Animal Movie: गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी अशा प्रकारच्या चित्रपटांचे यश धोकादायक असल्याचे म्हटले होते. ज्यामुळे वादाला तोंड फुटले. आता 'ॲनिमल' वर टीका करणाऱ्या जावेद अख्तर यांना उत्तर देत संदीप रेड्डी वंगा यांनी सवाल केला आहे.

Priya More

Sandeep Reddy Vanga On Javed Akhtar:

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) स्टारर आणि संदीप रेड्डी वंगा (Sandeep Reddy Vanga) दिग्दर्शित 'ॲनिमल' चित्रपट (Animal Movie) मागच्या वर्षी रिलीज झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिससह वर्ल्डवाइड चांगली कमाई केली. एकीकडे या चित्रपटाने बक्कळ कमाई केली असली तरी देखील त्यामधील सिन्सवर आक्षेप घेत टीका करण्यात आली. हा चित्रपट दुर्व्यवहार आणि विषारी पुरुषत्वाचा प्रचार करत असल्याचे मत अनेकांनी मांडले. बॉलिवूडचे प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी अशा प्रकारच्या चित्रपटांचे यश धोकादायक असल्याचे म्हटले होते. ज्यामुळे वादाला तोंड फुटले. आता 'ॲनिमल' वर टीका करणाऱ्या जावेद अख्तर यांना उत्तर देत संदीप रेड्डी वंगा यांनी सवाल केला आहे.

दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांनी त्यांच्या चित्रपटावर टीका करणाऱ्या जावेद अख्तर यांना प्रत्युत्तर दिले आहे. 'मिर्झापूर' या लोकप्रिय वेब सीरिजची निर्मिती करणारा तुमचा मुलगा फरहान अख्तर याच्याबद्दलही अशीच चिंता व्यक्त केली आहे का?, असा सवाल संदीप रेड्डी वंगा यांनी केला आहे. सिद्धार्थ कन्नन यांच्याशी संवाद साधताना संदीप रेड्डी वंगा यांनी जावेद अख्तर यांच्या 'ॲनिमल' या चित्रपटावरील टीकेवर आपले मत व्यक्त केले.

संदीप रेड्डी वंगाने सांगितले की, जावेद अख्तरच्या वक्तव्यावरून असे सूचित होते की टीका करण्यापूर्वी त्यांनी संपूर्ण चित्रपट पाहिला नव्हता. यासोबतच ‘फरहान अख्तर जेव्हा मिर्झापूर बनवत होता, तेव्हा त्यांनी त्याला हेच का सांगितलं नाही?’ असा सवालही संदीप रेड्डी वंगाने उपस्थित केला आहे. जगभरातील शिव्या मिर्झापूर या वेब सिरीजमध्ये आहेत आणि मी संपूर्ण सीरिज पाहिली नाही. जर ही संपूर्ण वेब सीरिज तेलुगुमध्ये अनुवादित केली जाईल आणि ती तुम्ही पाहिल्यावर उलट्या कराल. ते आपल्या मुलाचे काम का तपासत नाही?', असा सवाल रेड्डींनी केला आहे.

जावेद अख्तर यांनी औरंगाबाद येथील अजिंठा वेरूळ इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये केलेल्या भाषणादरम्यान आजच्या चित्रपटसृष्टीत लोकप्रियता मिळवणाऱ्या चित्रपटांच्या प्रकारांवर संवाद साधला होता. रणबीर कपूर स्टारर 'ॲनिमल' या चित्रपटाचा थेट उल्लेख न करता त्यांनी चिंता व्यक्त केली होती. ते म्हणाले होते की, 'जर असा एखादा चित्रपट असेल ज्यात एखादा पुरुष एखाद्या स्त्रीला म्हणतो, 'तू माझे बूट चाट', जर एखादा पुरुष म्हणतो, 'या महिलेला कानाखाली मारण्यात काय चूक आहे?' तो चित्रपट सुपरहिट झाला तर ती खूप धोकादायक गोष्ट आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank Rules : बँक खात्यात ठेवावे लागणार 50 हजार रुपये? काय आहे नवा नियम? VIDEO

Mumbai Metro7A: ट्रॉफिकचं नो टेन्शन; दहिसर ते एअरपोर्ट फक्त ५० मिनिटात पोहोचा, जाणून घ्या Metro 7चा मार्ग, तिकीट दर अन् थांबे

रिक्षाचालकांची तुफान हाणामारी, VIDEO व्हायरल झाल्यानंतर खळबळ

Shocking : मुंबईचा तरुण लातुरात आला, लाईव्ह येऊन सगळं सांगितलं; नंतर अचानक आयुष्य संपवलं

Sunday Horoscope : संडे ४ राशींसाठी ठरणार धोक्याचा? जाणून घ्यायचं असेल तर वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT