Raha Birthday Celebration Saam Tv
मनोरंजन बातम्या

Raha Birthday Celebration: 'बेबी टायगर...' १ वर्षांची झाली राहा, आलिया भट्टने शेअर केले मुलीच्या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो

Raha 1st Birthday Celebration Photo: आलियाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर राहाच्या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.

Priya More

Alia Bhatt Post For Raha:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांची मुलगी राहा 1 वर्षांची झाली आहे. आलियाने ६ नोव्हेंबर म्हणजे सोमवारी पती रणबीर कपूरसोबत मुलगी राहाचा पहिला वाढदिवस (Raha 1st Birthday) मोठ्या थाटामाटात साजरा केला.

आलियाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर राहाच्या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. या फोटोंच्या माध्यमातून आलियाने मुलगी राहाची झलक दाखवली आहे. राहाच्या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आलिया भट्टने इन्स्टाग्रामर शेअर केलेल्या पहिल्या फोटोमध्ये राहाने केकवर हात ठेवल्याचे दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये राहा झेंडूची फुले हातात धरताना दिसत आहे. तिसर्‍या व्हिडीओमध्ये एक छोटा म्युझिक बॉक्स आहे ज्यामध्ये 'ला वी एन रोज' हे गाणे वाजताना ऐकायला मिळत आहे. राहाच्या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो खूपच क्युट आहेत. राहाचे चिमुकल्या हातांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या फोटोंमध्ये आलियाने आपल्या मुलीचा चेहरा मात्र दाखवला नाही.

आलियाने राहाच्या बर्थडे सेलिब्रेशनचे हे क्युट फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये असे लिहिले की, 'आमचा आनंद, आमचं आयु्ष्य, आमचा प्रकाश, असे वाटते की कालच आम्ही हे गाणं तुझ्यासाठी वाजवत होतो आणि तू माझ्या पोटात लाथ मारत आहेस. तू आमच्या आयुष्यात आल्याने आम्ही धन्य झालो हे वेगळे सांगायची गरज नाही. तुला प्रत्येक दिवस एक परिपूर्ण क्रीमी स्वादिष्ट केकच्या तुकड्याप्रमाणे अनुभवत आहोत. वाढदिवसाच्या शुभेच्छा 'बेबी टायगर'... आम्ही तुमच्यावर खूप प्रेम करतो.'

आलियाच्या या पोस्टला १७ लाखांपेक्षा अधिक जणांनी पसंती दिली आहे. आलिया आणि रणबीरच्या चाहत्यांनी या फोटोंवर कमेंट्स करत राहाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

राहाची आजी नीतू कपूर आणि सोनी राजदान आणि आत्या रिद्धिमा कपूर यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम स्टोरीजच्या माध्यमातून राहाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आलियाची आई सोनी राजदान यांनी या पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'असं वाटतंय ती आत्ताच तू या जगात आली. एक वर्ष झालं असं अजिबात वाटत नाही. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा' रणबीर कपूरच्या 'संजू'मध्ये को-स्टार असलेल्या दिया मिर्झानेही आलिया भट्टच्या पोस्टवर कमेंट केली आहे. अभिनेत्रीने लिहिले- ‘हॅपी फर्स्ट बर्थडे राहा’.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

WPL 2026: छोटा पॅकेट, बडा धमाका! वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या फलंदाजाकडं दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्व

Wednesday Horoscope : शांतपणे आपला पल्ला गाठाल; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात बुधवारी चांगल्या गोष्टी घडणार

पुणे-बेंगळुरू माaर्गावर बसवर दरोडा, बसमधील दरोड्याचा कट कुठे शिजला? हादरवणाारी माहिती समोर

Maharashtra Live News Update: निष्ठावंताना न्याय द्या, पुण्यात शिवसैनिक आक्रमक

Tragic Incident: शेकोटीनं घेतला जीव; हॉटेलच्या रुममध्ये ५ जणांचा गुदमरुन मृत्यू

SCROLL FOR NEXT