दिवाळीला अवघे काही दिवस उरले आहे. त्यामुळे घराघरात तयारीला सुरूवात झाली आहे. दिवाळीत आपण पाहुण्यांना भेटवस्तू देतो. दिवाळीतील एक दिवस म्हणजे भाऊबीज. भाऊबीजेला भाऊ बहिणीला काही न काही भेटवस्तू देतो. यात एक गोष्ट कॉमन असते ती म्हणजे चॉकलेट. चॉकलेटशिवाय भाऊबीज ही होत नाही. परंतु या वर्षीची भाऊबीज भावांच्या खिशाला फटका देणार आहे.
दिवाळीत अनेकदा भेटवस्तू म्हणून आपण चॉकलेट देतो. त्यामुळेच दिवाळीत चॉकलेटविक्रेत्यांची, उत्पादकांनी चांगलीच कमाई होताना दिसते. परंतु या वर्षी चॉकलेट महागणार असून ग्राहकांच्या खिशाला फटका बसणार आहे.
दिवाळीपासून ते अगदी नवीन वर्ष सुरु होईपर्यंत चॉकलेटची मागणी मोठ्या प्रमाणात असते. या काळात पाहुण्यांना, मित्रांना चॉक्लेट देतात. मात्र, यंदा चॉकलेट घेण्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत.
सततच्या हवामान बदलामुळे कोकोच्या उत्पादनाला फटका बसला आहे. वातावरण कोकोच्या उत्पादनासाठी योग्य नसल्याने ही समस्या उद्भवली आहे. त्याचसोबत आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे उत्पादन घटले आहे. कोको आणि साखरेच्या वाढत्या भावामुळे चॉकलेटच्या उत्पादनात खर्च वाढणार आहे. परिणामी बाजारातही चॉकलेट महागणार आहेत.
एका रिपोर्टनुसार, गेल्या ४५ वर्षातील कोकोचे भाव पहिल्यांदाच एवढे जास्त वाढले आहे. मागच्या एका वर्षात कोकोच्या किमती ६५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे चॉक्लेटच्या मागणीवरदेखील परिणाम झाला आहे. या वर्षात कोकोच्या मागणीत १८ टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळेच चॉकलेटचे भाव लाढणार असून ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.
भारतात साखरेचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. तसेच जगभरातूनही निर्यात केले जाते. परंतु बदलत्या वातावरणामुळे या वर्षी साखरेचे उत्पादन घटले आहेत. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत चॉकलेटसाठी ग्राहकांना जास्त पैसे द्यावे लागणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.