Bade Miyan Chote Miyan Title Track Released Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bade Miyan Chote Miyan: 'बडे मियाँ छोटे मियाँ'चे टायटल ट्रॅक आऊट, अक्षय कुमार- टायगर श्रॉफच्या केमिस्ट्रीला पसंती

Bade Miyan Chote Miyan Title Track Released: निर्मात्यानी १९ फेब्रुवारीला हे गाणं रिलीज करण्याचे आश्वासन दिलं होतं. त्याप्रमाणे आज हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे. सध्या सोशल मीडियावर हे गाणं धुमाकूळ घालत आहे. अवघ्या काही मिनिटांमध्ये या गाण्याला लाखों व्ह्यूज मिळाले आहेत.

Priya More

Bade Miyan Chote Miyan Title Song:

बॉलिवूडचा (Bollywood) 'खिलाडी' आणि ॲक्शन सुपरस्टार अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) सध्या त्यांचा आगामी ॲक्शन-पॅक फ्लिक 'बडे मियाँ छोटे मियाँ'मुळे (Bade Miyan Chote Miyan Movie) चर्चेत आहे. या चित्रपटाची त्यांचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. सध्या या चित्रपटाची टीम प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

या चित्रपटाच्या टीझरनंतर प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता वाढली होती. आता या चित्रपटाचे टायटल ट्रॅक रिलीज झाले आहे. निर्मात्यानी १९ फेब्रुवारीला हे गाणं रिलीज करण्याचे आश्वासन दिलं होतं. त्याप्रमाणे आज हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे. सध्या सोशल मीडियावर हे गाणं धुमाकूळ घालत आहे. अवघ्या काही मिनिटांमध्ये या गाण्याला लाखों व्ह्यूज मिळाले आहेत.

'बडे मियाँ छोटे मियाँ'ची चर्चा त्याच्या मूळ चित्रपटामुळे कायम आहे. 1998 मध्ये रिलीज झालेला अमिताभ बच्चन आणि गोविंदा स्टारर 'बडे मियाँ छोटे मियाँ' हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. या जोडीने चित्रपटात प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. अशामध्ये प्रेक्षकांना या चित्रपटाच्या सिक्वलकडून देखील अशाच प्रकारची अपेक्षा आहे. अक्षय कुमारने अलीकडेच 'बडे मियाँ छोटे मियाँ'च्या टायटल साँगच्या रिलीजची माहिती शेअर केली होती. तेव्हापासून या गाण्याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली होती. आज हे गाणं रिलीज झालं असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. अक्षयने देखील आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे गाणं शेअर केलं आहे.

या चित्रपटाच्या टायटल साँगमध्ये अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफच्या डान्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. या दोघांची केमिस्टी प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. अनिरुद्ध रविचंदर आणि विशाल मिश्रा यांनी 'बडे मियाँ छोटे मियाँ'च्या टायटल साँगला आवाज दिला आहे. या गाण्याचे बोल इर्शाद कामिल यांनी लिहिले आहेत. तर विशाल मिश्राने या गाण्याला संगीत दिले आहे. 'बडे मियाँ छोटे मियाँ' बॉस्को-सीझर या जोडीने कोरिओग्राफ केले आहे.

'बडे मियाँ छोटे मियाँ'वर निर्मात्यांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण भारताबरोबरच परदेशातही झाले आहे. 'बडे मियाँ छोटे मियाँचे अनेक स्टंट सीन्स हॉलिवूड ॲक्शन एक्स्पर्ट्सच्या टीमसोबत शूट करण्यात आले आहेत. या चित्रपटाच्या स्टारकास्टबद्दल बोलायचे झाले तर, अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात त्याच्यासोबत सोनाक्षी सिन्हा, मानुषी छिल्लर आणि अलाया एफ आणि रोनित रॉय हे कलाकार देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. साऊथ अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन 'बडे मियाँ छोटे मियाँ'चा एक भाग आहे. त्याने या चित्रपटात विलनची भूमिका साकारली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPS Anjana Krushna: IPS अंजना कृष्णा याचं काय चुकलं? ठाकरेंच्या नेत्याचा अजित पवारांना सवाल

Red Fort History: ऐतिहासिक लाल किल्ल्याचे बांधकाम किती दिवसांमध्ये पूर्ण झाले?

Pitru Paksha 2025 : पितृंचे तर्पण करताना लक्षात ठेवा हे नियम

'ही शान कुणाची, लालबागच्या राजाची!' मंडपाबाहेर येताच देशभक्तीवर गाणं वाजलं, भाविकांच्या अंगावर काटा अन् डोळ्यात अश्रू

Akshay Kumar: अक्षय कुमारचा दिलदारपणा; पूरग्रस्तांना केली ५ कोटींची मदत, म्हणाला 'ही माझी...

SCROLL FOR NEXT