Shaitaan Box Office Day 2 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shaitaan Box Office Day 2: अजय देवगणच्या 'शैतान'ने कमाईमध्ये घेतली उंच उडी, 2 दिवसांत केलं इतकं कलेक्शन

Shaitaan Movie Collection: रिलीजच्या पहिल्या दिवशी या चित्रपटाने चांगली कमाई केली होती. तर रिलीजच्या दुसऱ्या दिवशी तर या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत उंच उडी घेतली आहे. दोन दिवसांत या चित्रपटाने किती कमाई केली हे आपण जाणून घेणार आहोत...

Priya More

Shaitaan Movie:

बॉलिवूड (Bollywood) सुपरस्टार अजय देवगण (Ajay Devgn) आणि आर माधवन (R Madhvan) स्टारर 'शैतान' चित्रपट (Shaitaan Movie) नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी या चित्रपटाने चांगली कमाई केली होती. तर रिलीजच्या दुसऱ्या दिवशी तर या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत उंच उडी घेतली आहे. शनिवारी या चित्रपटाच्या सकाळच्या शोच्या तुलनेत रात्रीच्या शोमध्ये प्रेक्षकांची संख्या जास्त होती. या चित्रपटाने दोन दिवसांमध्ये बक्कळ कमाई केली आहे.

विकास बहल यांनी दिग्दर्शित केलेला सुपरनॅचरल हॉरर-थ्रिलर चित्रपटाने दुसऱ्या दिवशी ओपनिंग डेच्या तुलनेत २७ टक्के जास्त कमाई केली आहे. या चित्रपटाला मिळणारा रिस्पॉन्स पाहता हा चित्रपट रविवारी म्हणजे तिसऱ्या दिवशी देखील २० कोटींपेक्षा जास्त कमाई करेल असा अंदाज वर्तवला जात आहे. बॉक्स ऑफिसवर असं पहिल्यांदा घडत आहे की, एखादा हॉरर चित्रपट अशापद्धतीने कमाई करत आहे. शुक्रवारी महाशिवरात्रीच्या दिवशी रिलीज झालेल्या या चित्रपटाने सुट्टीच्या दिवसाचा चांगला फायदा करून घेतला आहे. शैतान चित्रपटाच्या समोर दुसरा कोणाताच मोठा चित्रपट नाही. कोणतीही स्पर्धा नसल्यामुळे या चित्रपटाला चांगला फायदा होईल.

sacnilk च्या रिपोर्टनुसार, 'शैतान' ने पहिल्या दिवशी 14.75 कोटी रुपयांचे नेट कलेक्शन केले होते. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी 18.75 कोटींची कमाई केली. अशाप्रकारे दोन दिवसांत चित्रपटाने देशभरात एकूण 33.50 कोटींचा व्यवसाय केला आहे. रविवारी हा चित्रपट 50 कोटींच्या कमाईचा टप्पा सहज पार करेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

शनिवारी मॉर्निंग शोमध्ये 18.01% प्रेक्षक दिसले. ही संख्या दुपारच्या शोमध्ये 28.45% आणि संध्याकाळच्या शोमध्ये 37.31% पर्यंत वाढली होती. तर रात्रीच्या शोमध्ये 50.84% ​​सीट्सवर प्रेक्षक दिसले. रविवारी ही संख्या आणखी वाढणार असल्याचे दिसून येत आहे. रविवारी तिसऱ्या दिवशी मॉर्निंग शोमध्ये 19-20 टक्के प्रेक्षकांची उपस्थिती नोंदवण्यात आली आहे. यावरून या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime : समलैंगिक प्रेमाचा धक्कादायक शेवट! घरी जाण्यास नकार दिला, पार्टनरने छातीत चाकू खुपसला अन्...

Crime: कोचकडून हॉकी खेळाडूवर बलात्कार, स्टेडिअमच्या बाथरूमध्ये नेलं अन्...; पीडित मुलगी गरोदर

X युजर्स सावधान! हे नियम पाळा नाहीतर तुमचंही अकाउंट होईल Delete

Maharashtra Live News Update : माजी आमदार शिरीष चौधरींच्या घरावर हल्ला, राजकीय षडयंत्र

Bigg Boss House: बिग बॉस मराठी६ सुरू होण्याआधी घराची पहिली झलक आली समोर; रहस्यांनी भरलेल्या घरात काय आहे नवीन?

SCROLL FOR NEXT