Uorfi Javed Trolled Saam Tv
मनोरंजन बातम्या

Uorfi Javed Video: ब्रह्मांड धोक्यात आहे..., उर्फी जावेदच्या अतरंगी ड्रेसवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

Uorfi Javed Trolled: अनेकदा विचित्र ड्रेसिंग स्टाईल करणं उर्फीला महागात देखील पडले आहे. बऱ्याचदा ती सोशल मीडियावर ट्रोल देखील होत असते. असे असताना देखील उर्फी जावेद रोज नवनवीन लूकमध्ये कॅमेऱ्यासमोर येत असते.

Priya More

Uorfi Javed Stylish Look:

सोशल मीडिया सेन्सेशन आणि बिग बॉस ओटीटी फेम उर्फी जावेद (Uorfi Javed) आपल्या अतरंगी आणि हटके ड्रेसिंग स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत राहते. उर्फी जावेदचा फॅशन सेन्स पाहून सगळेच आश्चर्यचकीत होतात. अनेकदा विचित्र ड्रेसिंग स्टाईल करणं उर्फीला महागात देखील पडले आहे. बऱ्याचदा ती सोशल मीडियावर ट्रोल देखील होत असते. असे असताना देखील उर्फी जावेद रोज नवनवीन लूकमध्ये कॅमेऱ्यासमोर येत असते. आता तर उर्फी जावेदचा कधी न पाहिलेला आणि हटके लूक पाहायला मिळाला आहे. उर्फीच्या या नव्या ड्रेसची सध्या जोरदार चर्चा होत असून तिचे फोटो व्हायरल होत आहेत.

उर्फी जावेदच्या नव्या लूकमधील व्हिडीओ विरल भैयानीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, उर्फी जावदेने ब्लॅक कलरचा हटके वनपीस परिधान केला आहे. उर्फीने यावेळी तोडके-मोडके कपडे परिधान केले नाही. तर तिने घातलेला वनपीस जरा हटकेच होता. यामध्ये ती एखाद्या डॉलसारखी दिसत होती. तिच्या या वनपीसमध्ये ब्रह्मांड पाहायला मिळत आहो. उर्फी जावेदच्या भोवती संपूर्ण ब्रह्मांड फिरत असल्याचे दिसत आहे.

उर्फी जावेदच्या या वनपीसची कमाल म्हणजे यामध्ये संपूर्ण ब्रह्मांडची झलक पाहायला मिळत आहे. उर्फीच्या भोवती संपूर्ण ब्रम्हांड फिरत असल्याचे दिसत आहे. उर्फी जावेदला या ड्रेसमध्ये नीट चालता देखील येत नव्हते. ४ जण तिला हात धरून चालवत आणताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. यावेळी पापाराझींना उर्फी जावेद सांगते की, 'सेंटर ऑफ युनिव्हर्स आहे मी.' नेहमीप्रमाणे या ड्रेसमुळे देखील उर्फी जावेदला ट्रोल करण्यात आले आहे. तिच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. जे पाहून तुम्हीही पोट धरून हसाल.

उर्फीच्या या व्हायरल व्हिडीओवर कमेंट करत एका नेटकऱ्याने लिहिले की, ब्रह्मांड धोक्यात आहे. दुसऱ्या युजरने लिहिले की, 'मला हे समजत नाही ही अशी कपडे घालून नेमकी जाते कुठे' तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिले की, 'मॉमने माझा शाळेचा प्रोडक्ट घालता.' चौथ्या नेटकऱ्याने लिहिले की, 'सायन्सला पुढे घेऊन जात आहे.' आणखी एका नेटकऱ्याने लिहिले की, 'चांगले आहे..संपूर्ण ब्रह्मांड उचलून घेऊन जा.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai: भारताच्या स्टार क्रिकेटपटूला अंडरवर्ल्डकडून धमकी, ५ कोटींच्या खंडणीची मागणी

Maharashtra Live News Update: महावितरणचे राज्यव्यापी संप सुरू

फरहानानंतर कोण बनला 'Bigg Boss 19'च्या घराचा नवा कॅप्टन?

Navapur : आश्रम शाळेतील सहा वर्षीय विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू; नवापूर तालुक्यातील घटनेने खळबळ

म्हाडाची बंपर ऑफर! मुंबईतील प्राईम लोकेशनवरील घरांची थेट विक्री, घरे भाड्यानं देण्यासही तयार

SCROLL FOR NEXT