Sunny Leone Saam tv
मनोरंजन बातम्या

Sunny Leone: सनी लिओनी लवकरच घेऊन येतेय नवा शो, 'ग्लॅम फेम'मध्ये दिसणार जजच्या भूमिकेत

Glam Fame Reality Show: या रियालिटी शोमध्ये नील नितीन मुकेश, ईशा गुप्तासोबत अभिनेत्री सनी लिओनी जजच्या भूमिकेत दिसणार आहेत.

Priya More

Glam Fame Show:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) लवकरच एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सनी लिओनी 'ग्लॅम फेम' या शोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भारतातील महत्वकांक्षी मॉडेलच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी हा नवा रियालिटी शो 'ग्लॅम फेम' (Glam Fame Show) लवकरच सुरू होणार आहे. या रियालिटी शोमध्ये नील नितीन मुकेश, ईशा गुप्तासोबत अभिनेत्री सनी लिओनी जजच्या भूमिकेत दिसणार आहेत.

अभिनेत्री सनी लिओनी आता एका नवीन भूमिकेत पाऊल ठेवणार आहे. सनी लिओनी देशभरातील महत्त्वाकांक्षी मॉडेल्सना प्रेरणा देणारा आगामी रिअॅलिटी शो 'ग्लॅम फेम' मध्ये जजची भूमिका बजावताना दिसणार आहे. हा एक अनोखा प्लॅटफॉर्म आहे ज्याचा उद्देश भारतातील नव्या मॉडेल्सच्या स्वप्नांना वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्यास मदत करणार आहे.

सनी लिओनीने सांगितले की, 'मॉडेलला प्रेरणा देऊन त्यांना त्यांच्या करीयरमध्ये पुढे जाण्यासाठी नक्कीच आम्ही मदत करणार आहोत. या शोमधून पुढच्या पिढीच्या महत्त्वाकांक्षी मॉडेल्सना मार्गदर्शन करण्याची अनोखी जबाबदारी माझ्यावर आहे आणि यासाठी मी खूपच उत्सुक आहे. माझा विश्वास आहे की, या मॉडेल्सनी सध्याचा ट्रेंड समजून घेतला पाहिजे आणि हे व्यासपीठ प्रतिभावान तरुणांना स्फूर्ती देणार आहे. '

रोहित खंडेलवाल, संतोषी शेट्टी, दिनेश शेट्टी आणि प्रसिद्ध फॅशन आणि लाइफस्टाइल फोटोग्राफर डब्बू रतनानी यांसारखे मार्गदर्शक याच शोचा भाग असणार आहेत. व्हॉटवर प्रॉडक्शन आणि कृष्णा कुंज प्रॉडक्शनची सहनिर्मिती असलेला 'ग्लॅम फेम' लवकरच जिओ सिनेमावर प्रदर्शित होणार आहे. हा शो महत्त्वाकांक्षी मॉडेल्सना तज्ञांकडून शिकण्याची आणि स्वतःचे मार्ग तयार करण्याची संधी देऊन मॉडेलिंग उद्योगात बदल घडवून आणेल.

‘ग्लॅम फेम’ सीझन एकमध्ये १० ते १२ एपिसोड असतील. भारताच्या कानाकोपऱ्यातील इच्छुक उमेदवारांची डिजिटल स्क्रीनिंग प्रक्रियेद्वारे निवड केली जाईल. जे यशस्वी झाले तर ते एक रोमांचक प्रवास सुरू करतील. ज्यामध्ये १२ मोठ्या शहरांमध्ये वैयक्तिक मुलाखती आणि ग्रुप चर्चा आयोजित केल्या जातील. यामधूनच या शोसाठीचे स्पर्धक निवडले जातीत. या शोला खूप चांगले जज मिळाले आहेत. त्यामुळे हा शो प्रसिद्ध होईल असे दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्याचा दुसरा मानाचा तांबडी जोगेश्वरी गणपती पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जित|VIDEO

Shreyas Iyer captain : श्रेयस अय्यर कर्णधार, बीसीसीआयचा मोठा निर्णय; संघाचीही घोषणा

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

Anant Chaturdashi 2025 live updates : वर्धा जिल्ह्यात भक्तिभावात बाप्पांना निरोप

SCROLL FOR NEXT