Hasan Raza Statement: चेक करा, DRS मध्ये हेराफेरी केली जातेय..भारताच्या सलग आठव्या विजयानंतर माजी पाकिस्तानी खेळाडूचा आरोप

Hasan Raza On DRS: पाकिस्तानच्या माजी खेळाडूने DRS बाबत बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे.
team india
team indiatwitter
Published On

Hasan Raza Statement:

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत दमदार कामगिरी करतोय. भारतीय संघाने या स्पर्धेत आतापर्यंत ८ सामने खेळले आहेत. हे ८ सामने जिंकून १६ गुणांसह भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे.

भारतीय संघाने गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात अव्वल दर्जाचा खेळ केला आहे. एकिकडे भारतीय संघातील खेळाडूंचं कौतुक होत असताना पाकिस्तानच्या माजी खेळाडूने भारतीय संघावर टिका करत प्रश्न उपस्थित केला आहे.

भारतीय संघाने कोलकाताच्या ईडन गार्डनच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेवर २४३ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात हेनरीक क्लासेन LBW होऊन माघारी परतला. हा निर्णय चुकीचा असल्याचं पाकिस्तानचा माजी खेळाडू हसन रजाने म्हटलं आहे.

हसन रजाचं भारतीय संघावर आरोप करण्याचं सत्र काही थांबत नाहीये. यापूर्वी त्याने असा आरोप केला होता की, भारतीय गोलंदाजांना वेगळा बॉल दिला जातो. आता त्याने भारतीय संघावर DRS मध्ये फेरबदल केल्याचा आरोप केला आहे.

अमर उजालाच्या वृत्तानूसार, एबीएन न्यूजच्या एका चर्चा सत्रात बोलताना हसन रजा म्हणाला की,'रविंद्र जडेजाने ५ गडी बाद केले. ही त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी आहे. आम्ही इथे तंत्रझानाबद्दल बोलतोय जिथे DRS घेतला जातो. वान डर डुसेन एक फलंदाज आहे, बॉल लेग स्टम्पवर पडून मिडील स्टम्पला जाऊन लागला. हे कसं शक्य आहे? इम्पॅक्ट लाईनमध्ये होता मात्र बॉल लेग स्टम्पच्या दिशेने गेला.' (Latest sports updates)

team india
Shakib Al Hasan Ruled Out: मॅथ्यूजला टाईम आऊट करणारा शाकिब WC 2023 स्पर्धेतून बाहेर! मोठं कारण आलं समोर

तसेच तो पुढे म्हणाला की,'मी माझं मत मांडतोय. माझं हेच म्हणायचं आहे की तुम्ही चेक करा. DRS मध्ये हेराफेरी केली जात आहे आणि हे स्पष्टपणे दिसून येत आहे.'

team india
World Cup 2023: असलंकाच्या शतकानं उडवली बांगलादेशी गोलंदाजांची दाणादाण! विजयासाठी दिलं २८० धावांचं आव्हान

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com