Sunny Leone Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sunny Leone: ९ वर्षांच्या बेपत्ता मुलीच्या मदतीसाठी धावून आली सनी लिओनी, शोधणाऱ्याला बक्षीस म्हणून देणार इतकी रक्कम

Priya More

Sunny Leone Help To Missing Girl:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) सोशल मीडियावर (Social Media) खूप सक्रिय असते. सनी नेहमी आपल्या चाहत्यांसोबत वैयक्तिक आयुष्य आणि प्रोजेक्टशी संबंधित मनोरंजक पोस्ट शेअर करताना दिसते.

नुकताच सनी लिओनी आपल्या चाहत्यांकडे मदत करण्याची मागणी करत एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट बेपत्ता झालेल्या एका ९ वर्षांच्या चिमुकल्या मुलीला शोधण्यासाठीची आहे. ही पोस्ट शेअर करत सनीने मदत करणाऱ्याला ५० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

सनी लिओनीच्या घरामध्ये काम करणाऱ्या एका महिलेसाठी तिने ही मदत मागितली आहे. या महिलेची ९ वर्षांची मुलगी हरवली आहे. सनी लिओनीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर बेपत्ता झालेल्या या मुलीचा फोटो शेअर करत संपूर्ण घटना सांगितली आहे. जर तुम्हाला या मुलीबद्दल काही माहिती मिळाली तर तात्काळ संपर्क करा असं तिने म्हटलं आहे.

सनी लिओनीने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये बेपत्ता मुलीचा फोटो शेअर केला आहे आणि त्यासोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'जर ही मुलगी तिच्या घरी आणि कुटुंबाकडे सुखरूप परत आली तर मी वैयक्तिकरित्या त्या व्यक्तीला ५० हजार रुपये देईन. ती माझ्या घरातील कामे करणाऱ्या महिलेची मुलगी असून, अनुष्का मोरे असे तिचे नाव आहे. ती ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजल्यापासून बेपत्ता आहे.'

तसंच, 'ही मुलगी जोगेश्वरी पश्चिम येथील बेहराम बागमधील रहिवासी आहे. तिचे वय ९ वर्षे आहे. मुलीच्या शोधात तिचे पालक वेडे झाले आहेत. तुम्ही तिची आई सरिता यांच्याशी संपर्क करू शकता. तिच्या आईचा मोबाईल नंबर- ८८५०६०५६३२ आणि वडील किरण यांच्याशी ८२३७६३१३६० यांना फोन करून संपर्क साधू शकता. तुम्ही मलाही मेसेज करू शकता.', असं सनीने सांगितले आहे.

सनी लिओनीने पुढे लिहिले आहे की, 'जो व्यक्ती या मुलीचा शोध घेईल त्याला ११ हजार रुपये दिले जातील. ज्यामध्ये सनी लिओन आणखी ५० हजार रूपये देणार आहे. 'कृपया डोळे उघडे ठेवून या चिमुकलीचा शोध घ्या', असे आवाहन सनीने केले आहे. या पोस्टमध्ये सनीने मुंबई पोलिस, बीएमसी यांना टॅगही केले आहे. या प्रकरणातील संपूर्ण अपडेट अद्याप समोर आलेले नाही. पोस्टवर आलेल्या कमेंट्स पाहिल्या तर, मुलगी लवकरात लवकर सापडावी यासाठी अनेक जण प्रार्थना करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ex Boyfriend zodiac sign: एक्स बॉयफ्रेंड तुमच्या आयुष्यात पुन्हा डोकावतोय? राशीनुसार जाणून घ्या त्याचा प्लान

Sushil Kedia: ठाकरेंची माफी मागून केडियानं पुन्हा पलटी मारली; म्हणाला 'काय बोललो याचा पश्चाताप नाही'

CHYD : 'चला हवा येऊ द्या' महाराष्ट्राला खळखळून हसवायला सज्ज; कॉमेडीचं गँगवॉर 'या' दिवसापासून सुरू, पाहा VIDEO

दारूचे पैसे न दिल्याने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण; घटना CCTVत कैद

Bus Accident : भीषण अपघात; प्रवाशांनी भरलेली बस १५ फूट खोल नदीत कोसळली, दोन जणांचा मृत्यू, २५ जण जखमी

SCROLL FOR NEXT