Sonakshi Sinha Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sonakshi Sinha: सोनाक्षी सिन्हाच्या मॅनेजरला कोर्टाने केले फरार घोषीत, तिघांची प्रॉपर्टी जप्त होणार; नेमकं प्रकरण काय?

Moradabad Court: मुरादाबाद सत्र न्यायालयाने सोनाक्षीचे व्यवस्थापक मालविका पंजाबी, धोमिल ठक्कर आणि एडगर्ल साकारिया यांना फरार घोषित केले आहे. यापूर्वी तिघांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते.

Priya More

Sonakshi Sinha Manager :

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाबाबत (Sonakshi Sinha) एक मोठी बातमी समोर आली आहे. न्यायालयाने सोनाक्षी सिन्हाच्या मॅनेजरला फरार घोषित केले आहे. मुरादाबाद सत्र न्यायालयाने सोनाक्षीचे व्यवस्थापक मालविका पंजाबी, धोमिल ठक्कर आणि एडगर्ल साकारिया यांना फरार घोषित केले आहे. यापूर्वी तिघांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते. त्यानंतरही ते कोर्टात हजर न झाल्यास त्यांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले जाण्याची शक्यता आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे हे जाणून घेणार आहोत...

हे प्रकरण २०१९ मधील आहे. मुरादबाद येथील इव्हेंट कंपनीशी संबंधित असलेले प्रमोद शर्मा यांनी सोनाक्षी सिन्हाची मॅनेजर मालविका पंजाबी यांच्याशी मुरादाबादमधील एका कार्यक्रमासाठी संपर्क साधला होता. धुमिल ठक्कर आणि एडगर साकरिया यांच्याशीही कार्यक्रमाबाबत सर्व चर्चा झाली होती. प्रमोदने त्यांनी सांगितलेली फी भरली. पण सोनाक्षी सिन्हा या कार्यक्रमाला आलीच नाही.

यानंतर प्रमोद शर्मा यांनी 36 वर्षीय सोनाक्षी सिन्हा आणि तिच्या मॅनेजरसह इतर तिघांविरुद्ध कटघर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर सोनाक्षी आणि इतर आरोपींनी उच्च न्यायालयात धाव घेतली आणि त्यांना दिलासा मिळाला. परंतु 2020 मध्ये पोलिसांनी तपास पूर्ण करून सर्वांविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.

सोनाक्षीने पुन्हा एकदा उच्च न्यायालयात धाव घेत या प्रकरणात पुन्हा दिलासा मिळवला. पण इतर तीन जणांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले. हे तिघेही न्यायालयात हजर झाले नाहीत. आता त्यांना न्यायालयाने फरार घोषित केले आहे. आता न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार जर हे तिघेही न्यायालयात हजर न झाल्यास त्यांची प्रॉपर्टी देखील जप्त करण्याचे आदेश न्यायालयाकडून दिले जाण्याची शक्यता आहे.

सोनाक्षी सिन्हाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, सोनाक्षीकडे सध्या अनेक प्रोजेक्ट्स आहेत. संजय लीला भन्साळी यांच्या 'हिरामंडी' या पहिल्या वेब सीरिजमध्ये ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सोनाक्षी सिन्हाकडे 'बडे मियाँ छोटे मियाँ' हा चित्रपटही आहे. ज्यामध्ये ती अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. सोनाक्षी सिन्हाच्या या चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT