मनोरंजन बातम्या

Shraddha Kapoor New Car: दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर श्रद्धा कपूरने खरेदी केली Lamborghini Car, किंमत ऐकून येईल चक्कर

Bollywood Actress Shraddha Kapoor: दसऱ्या दिवशी श्रद्धाने स्वत:लाच ही कार गिफ्ट केली आहे.

Priya More

Shraddha Kapoor Buy Lamborghini:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री श्रद्धा कपूर (Sharaddha Kapoor) सध्या चर्चेत आली आहे. श्रद्धा कपूरकडे सध्या अनेक जबरदस्त प्रोजेक्ट्स आहेत ज्यावर ती काम करत आहेत. पण ती सध्या कोणत्याही चित्रपटामुळे नाही तर तिच्या घरी आलेल्या नव्या पाहुण्यामुळे चर्चेत आली आहे.

श्रद्धा कपूरने दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आलिशान कार खरेदी केली आहे. दसऱ्याच्या दिवशी श्रद्धाने स्वत:लाच ही कार गिफ्ट केली आहे. श्रद्धाचे नव्या कारसोबतचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

श्रद्धाने खरेदी केलेल्या नव्या लॅम्बोर्गिनी कारसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. automobiliardent या इन्स्टाग्राम अकाऊंटवर श्रद्धा कपूरच्या नवीन कारचे फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. या पोस्टला कॅप्शन देत असे लिहिले आहे की, 'कोणतीही विचित्र पद्धत नाही. श्रद्धा कपूरने नुकतीच हुराकन टेक्निका खरेदी केली आहे. ती कदाचित बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या सेलिब्रिटींपैकी एक नसेल. पण श्रद्धा कपूर वेगळी आहे. आता तिला या Rosso Anteros Lamborghini Huracan Tecnica ला पिक अप करताना पाहून खूप छान वाटेल.'  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

श्रद्धा कपूरने नव्या कारसोबत काही फोटो काढले आहेत. शोरूममधून समोर आलेल्या फोटोंमध्ये श्रद्धा कपूर पांढऱ्या रंगाच्या प्रिंटेड सूटमध्ये दिसत आहे. अभिनेत्रीने कपाळावर टिकली, लाईट मेकअप आणि केस मोकळे सोडत लूक परिपूर्ण केल्याचा दिसत आहे. या लूकमध्ये ती नेहमीसारखी खूपच सुंदर दिसत आहे. व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये श्रद्धा तिच्या नवीन लाल रंगाच्या लॅम्बोर्गिनी कारसोबत सेल्फी घेताना दिसत आहे. श्रद्धाने आपल्या नवीन कारची पूजा देखील केली. त्याचे व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत.

अभिनेत्रीला कारची खूप आवड आहे. तिच्या कार कलेक्शनमध्ये आता लॅम्बोर्गिनीचाही समावेश झाला आहे. श्रद्धाच्या कारची किंमत ऐकून अनेकांना धक्का बसला आहे. या कारची किंमत 4.04 कोटी रुपये आहे. ऑटोटेक पोर्टलनुसार, याआधी श्रद्धाने BMW 7 सीरीज खरेदी केली होती. ज्याची किंमत 2.46 कोटी रुपये होती. त्यापूर्वी अभिनेत्रीकडे मर्सिडीज बेंझ जीएलई होती. ज्याची किंमत 1.01 कोटी रुपये होती.

श्रद्धा कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, अभिनेत्री शेवटची 'तू झठी में मकर' या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिच्यासोबत रणबीर कपूर दिसला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. आता अभिनेत्री तिच्या हॉरर- ड्रामा चित्रपट 'स्त्री 2' मध्ये दिसणार आहे. ज्यामध्ये तिच्यासोबत राजकुमार राव आणि पंकज त्रिपाठी मुख्य भूमिकेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Police Death: पोलीस दलात आत्महत्येचं सत्र काही थांबेना! ४ दिवसात ३ आत्महत्या, काय आहे कारण?

Mahalaxmi Vrat 2025 : महालक्ष्मी व्रताची तारीख, पूजा विधी, महत्व घ्या जाणून

Maharashtra Live News Update: ते वक्तव्य करून अजित पवारांकडून मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न; राम शिंदेंचा आरोप

Gunfire Shooting : क्लबमध्ये अंदाधुंद गोळीबार! तिघांचा जागीच मृत्यू, आठजण जखमी

Astro Tips: सकाळी उठल्यावर आरशात पाहणे शुभ असते की अशुभ?

SCROLL FOR NEXT