Richa Chaddha Saam Tv
मनोरंजन बातम्या

Richa Chadha: राधिका आपटेनंतर एअरपोर्टवर ४ तास अडकली रिचा चड्ढा, सोशल मीडिया पोस्ट करत व्यक्त संताप

Richa Chadha Tweet: रिचा चड्ढाने X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. रिचा चड्ढाने गेल्या तीन दिवसांत तीन विमानाने प्रवास केला. त्यापैकी दोन विमानं इंडिगोचे होते. तर तिसरे आंतरराष्ट्रीय विमान होते.

Priya More

Richa Chandha Stuck Ata Airport:

फ्लाइटला उशिर झाल्यामुळे फक्त सर्वसामान्यांना त्रास होत नाही तर सेलिब्रिटी देखील याचे बळी पडताना दिसत आहेत. सोनू सूद, रणवीर शौरी, सुरभी चंदना, राधिका आपटेनंतर आता आणखी एका अभिनेत्री एअरपोर्टवर (Airport) अडकली. या अभिनेत्रीने सोशल मीडियावर फ्लाइटच्या विलंबाची तक्रार केली आहे. अभिनेत्री ऋचा चड्ढाने (Richa Chadha) सोशल मीडियावर पोस्ट करत खुलासा केला की, 'ती देखील फ्लाइट विलंबाची बळी आहे.'

रिचा चड्ढाने X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. रिचा चड्ढाने गेल्या तीन दिवसांत तीन विमानाने प्रवास केला. त्यापैकी दोन विमानं इंडिगोचे होते. तर तिसरे आंतरराष्ट्रीय विमान होते. रिचा चढ्ढाने उघड केले की, तिची आंतरराष्ट्रीय विमानाची उड्डाणे वेळेवर होती. पण देशांतर्गत विमानाची उड्डाणे उशीरा झाली. सध्या सुरू असलेल्या विमानाच्या विलंबित उड्डाणांच्या वादावर रिचा म्हणाली की, 'नवी दिल्लीतील धुके आणि मुंबईत नुकत्याच झालेल्या एअर शोमुळे इंडिगो एअरलाइन्सची चिंता वाढली आहे.'

रिचा चड्ढाने आपल्या ट्विटमध्ये असे लिहिले की, 'तीस दिवसांत माझी तिसरी फ्लाइट... पहिल्या दिवशी इंडिगोला ४ तासांपेक्षा जास्त उशीर झाला. दुसऱ्या दिवशी इंडिगोला ४ तास उशीर झाला. परंतु काही मार्गांवर फक्त इंडिगोचीच थेट उड्डाणे असतात. दिवस तिसरा आंतरराष्ट्रीय फ्लाइट काहीच समस्या नाही. 14 जानेवारीला मुंबईत एअर शो होता. त्यामुळे सकाळी रनवे बंद करण्यात आला होता आणि नंतर उत्तर भारतात धुक्यामुळे दिल्लीतील रनवे बंद होता. यामुळे देशभरातील फ्लाइट्सला विलंब झाला.कर्मचार्‍यांची संख्या जास्त होती.'

इंडिगोच्या पायलटसोबत झालेल्या मारहाणीच्या घटनेचा उल्लेख करत रिचा चड्ढाने ट्विटमध्ये पुढे असे लिहिले की, 'एका प्रवाशाने इंडिगोच्या पायलटला मारहाण केली. रिचा चड्ढा म्हणाली, 'मला आश्चर्य वाटते की फक्त एका व्यक्तीवर शारिरीक हल्ला करण्यात आला. कारण राग खूप आला होता त्यामुळे हे घडले. पण मी अशाप्रकारच्या हिंसाचाराच्या विरोधात आहे. '

'इंडिगो वादामुळे मी एक महत्त्वाचा धडा शिकले आहे. धडा: मक्तेदारीचा. मग ती विमानसेवा असो, विमानतळाची मालकी असो किंवा नेतृत्व असो. जबाबदारीची कमतरता निर्माण करते. सामान्य नागरिकांना कोणत्याही उपायाशिवाय त्रास सहन करावा लागतो. जोपर्यंत आपण याला ओळखत नाही तोपर्यंत आपण असेच पैसे देऊन आपले नुकसान करत राहू. जर आपण आता जागे झालो नाही तर आपण याला स्वत: जबाबदार आहोत.'

रिचा चड्ढाच्या आधी अभिनेत्री राधिका आपटे एअरपोर्टवर अडकली होती. तिने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करत हा अनुभव सांगितला होता. दरम्यान, इंडिगो एअरलाइन्स नुकतीच आपल्या फ्लाइट्समध्ये होणारा विलंब आणि प्रवाशांसोबत गैरवर्तन केल्याबद्दल टीकेची शिकार झाली आहे. अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. सध्या यावरून सोशल मीडियावर इंडिगो एअरलाइन्सवर टीका होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

SCROLL FOR NEXT