Poonam Pandey Saam Tv
मनोरंजन बातम्या

Poonam Pandey ला साथ देणाऱ्या कंपनीने मागितली जाहिर माफी, म्हणाले - 'आमचा हेतू फक्त...'

Priya More

Poonam Pandey Death Fake News:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे (Poonam Pandey) अडचणीमध्ये आली आहे. 3 दिवसांपूर्वी पूनम पांडेने स्वत:च्याच मृत्यूची खोटी अफवा पसरवली होती. गर्भाशयाच्या कॅन्सरमुळे निधन झाल्याचे पूनम पांडेने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत सांगितले होते. पूनम पांडेच्या निधनामुळे (Poonam Pandey Death) सर्वांना मोठा धक्का बसला होता. त्यानंतर पूनम पांडेने रविवारी व्हिडीओ पोस्ट करत आपण जीवंत असल्याचे सांगितले. त्यानंतर पूनम पांडेवर टीकेची झोड सुरू आहे तिला ट्रोल केले जात आहे.

पूनम पांडेने तिच्या मृत्यूची बातमी अशाप्रकारे पसरवली की तिला आता लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. सोशल मीडियावर अभिनेत्रीला ट्रोल केले जात असून तिच्याविरोधात एफआयआरही दाखल करण्यात आला आहे. पूनम आणि तिला या नाटकामध्ये सपोर्ट करणारी कंपनी शाबांगने माफीनामा जारी केला आहे. या माफीनाम्यात त्यांनी दावा केला आहे की, 'पूनमच्या या फेक न्यूजमुळे गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची अधिक चर्चा होऊ लागली आहे. अभिनेत्रीची आई देखील या जीवघेण्या आजाराची शिकार झाली आहे.'

या नाटकात पूनम पांडेला पूर्ण पाठिंबा देणाऱ्या शाबांग कंपनीने आपल्या अधिकृत अकाऊंटवरून माफी मागितली आहे. या माफीनाम्यामध्ये कंपनीने लिहिले की, 'होय, हॉटरफ्लायच्या मदतीने आम्ही पूनम पांडेसोबत गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाविषयी जनजागृती करण्याच्या उपक्रमात सहभागी होतो. यासाठी आम्ही मनापासून माफी मागतो. विशेषत: ज्यांना कोणत्याही प्रकारच्या कर्करोगाचा सामना करावा लागतो.'

या पोस्टमध्ये कंपनीने पुढे लिहिले की, 'या पोस्टद्वारे आमचा उद्देश फक्त लोकांमध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाविषयी जागरूकता पसरवणे आहे. 2022 पासून, भारतात 123,907 गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची प्रकरणे आणि 77,348 मृत्यूची नोंद झाली आहे. स्तनाच्या कर्करोगानंतर मध्यमवर्गीय महिलांना होणारा हा दुसरा सर्वात धोकादायक आजार आहे.

यासोबतच कंपनीने दावा केला आहे की, 'बऱ्याच जणांना माहित नसेल की पूनम पांडेच्या आईनेही कॅन्सरशी धैर्याने लढा दिला आहे. हे जवळून पाहिल्यानंतर आणि तिच्या वैयक्तिक जीवनात अशा आजाराशी लढा देण्याच्या आव्हानांना सामोरे गेल्यानंतर अभिनेत्रीला त्याचे प्रतिबंध आणि जागरूकता यांचे महत्त्व चांगले समजते. तेही जेव्हा त्याची लस उपलब्ध असते. पूनमच्या या स्टेपनंतर गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा गुगलवर सर्वाधिक सर्च केला जाणारा विषय आहे. पहिल्यांदाच गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग 1000 हून अधिक हेडलाइनमध्ये आहे. आम्ही अजूनही त्या लोकांची माफी मागू इच्छितो ज्यांना यामुळे त्रास झाला. कोणत्याही गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. मात्र याबाबत जनजागृती केली तर मृत्यू टाळता येऊ शकतो.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT