स्टार प्रवाह वाहनीवरील प्रसिद्ध मालिका 'रंग माझा वेगळा'ला (Rang Maza Vegala) प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती मिळाली. या मालिकेमुळे अभिनेत्री रेश्मा शिंदे (Reshma Shinde) घरोघरी पोहचली. या मालिकेमध्ये रेश्मा शिंदेने दिपाची भूमिका साकारली होती. या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर अभिनेत्री रेश्मा शिंदे कोणत्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते खूपच उत्सुक होते. त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. रेश्मा शिंदे लवकरच नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'घरोघरी मातीच्या चुली' असं तिच्या नव्या मालिकेचे नाव आहे. या मालिकेमध्ये ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
कवयित्री विमल लिमये यांची 'घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती,' ही कविता सर्वांच्याच परिचयाची आहे. या कवितेतील ओळींचा नव्याने विचार करायला लावणारी आणि नात्यांचं महत्त्व पटवून देणारी नवी मालिका 'घरोघरी मातीच्या चुली' प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मालिकेच्या नावातच मालिकेची खरी गोष्ट दडलेली आहे. घर म्हण्टलं तर छोट्या मोठ्या कुरबुरी या आल्याच. मात्र घराला खऱ्या अर्थाने घरपण मिळतं ते घरातल्या आपल्या माणसांमुळे. याच आपल्या माणसांची गोष्ट 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेतून सांगण्यात येणार आहे.
रेश्मा शिंदेने आपल्या अधिकृत इम्स्टाग्राम अकाऊंटवर 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या मालिकेच्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, 'ती घरात धूप दाखवताना दिसत आहे. प्रत्येकीला वाटतं आपल्या घरात राम राज्य असावे. श्रीरामासारखा पती असावा. श्रीराम जानकी यांची आदर्श जोडी असून सुद्धा त्यांना आपल्याच माणसांमुळे वनवास भोगावा लागला. काळ बदलला तरी परिस्थिती बदलेलच असं नाही. म्हणतात ना व्यक्ती, तितक्या प्रकृती. तिची पूजा होते. तेवढ्यात आवाज येतो जानकी ऋषीचा फोन आला आहे. ती येते बोलून जाते.' रेश्मा शिंदेने हा प्रोमो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'खेळामध्ये संसाराच्या, आनंदाचे राज्य येवू दे… नवी मालिका ‘घरोघरी मातीच्या चुली’ लवकरच Star प्रवाह वर....'
अभिनेत्री रेश्मा शिंदे घरोघरी मातीच्या चुली मालिकेत जानकी हे महत्त्वाचं पात्र साकारणार आहे. रेश्मा शिंदेसोबत सविता प्रभुणे, प्रमोद पवार, उदय नेने, भक्ती देसाई, सुनील गोडसे, बालकलाकार आरोही सांबरे अशे दिग्गज कलाकार या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. स्टार प्रवाह प्रस्तुत या मालिकेची निर्मिती सुचित्रा आदेश बांदेकर यांच्या सोहम प्रोडक्शन्सने केली आहे. राहुल लिंगायत मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.