Arijit Singh चा माज उतरवणार, मनसेचा इशारा; पाकिस्तानी कलाकारांशी संबंधित प्रकरण नेमकं आहे तरी काय?

Pakistani Singer Atif Aslam: अतिफ अस्लमला (Atif Aslam) बॉलिवूडमध्ये काम मिळावं यासाठी प्रसिद्ध भारतीय गायक अरिजीत सिंग (Arijit Singh) प्रयत्न करत आहे. यावरून आता मनसे आक्रमक झाली आहे. मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी यासंदर्भात सोशल मीडिया पोस्ट केली आहे.
Amey Khopkar On Arijit Singh
Amey Khopkar On Arijit SinghSaam Tv
Published On

Amey Khopkar On Arijit Singh:

पुलवामा हल्ल्यानंतर (Pulwama Attack) पाकिस्तानी कलाकारांवर भारतात बंदी घालण्यात आली होती. यानंतर एकही पाकिस्तानी अभिनेता किंवा गायक बॉलिवूडच्या कोणत्याही चित्रपटात दिसला नाही. तसेच त्यांचा कोणताही लाईव्ह शो भारतात झाला नाही. मात्र आता अलीकडे ही बंदी हटवण्यात आली. त्यानंतर पाकिस्तानी गायक अतिफ अस्लम आता 7-8 वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक करत आहे.

अतिफ अस्लमला (Atif Aslam) बॉलिवूडमध्ये काम मिळावं यासाठी प्रसिद्ध भारतीय गायक अरिजीत सिंग (Arijit Singh) प्रयत्न करत आहे. यावरून आता मनसे आक्रमक झाली आहे. मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (MNS Leader Amey Khopkar) यांनी यासंदर्भात सोशल मीडिया पोस्ट केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी अरिजीत सिंगला इशारा दिला. त्याचसोबत पाकिस्तानी कलाकारांना भारतामध्ये मनसे खपवून घेणार नाही असे देखील त्यांनी खडसावून सांगितले आहे.

अमेय खोपकर यांनी नुकताच आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटर म्हणजेच ट्विटरवर यासंदर्भात पोस्ट केली आहे. त्यांनी या पोस्टमध्ये असे लिहिले की, 'अतिफ अस्लम या पाकड्या गायकाला बॉलीवूड फिल्ममध्ये गाण्यासाठी इथलेच काही निर्माते पायघड्या घालतायत. विरोध झाला तर फाट्यावर मारण्याची भाषा अरिजीत सिंग करतोय. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या बळावर फुरफुरणाऱ्यांची मस्ती आता उतरवावीच लागेल.'

त्यांनी या पोस्टमध्ये पुढे असे लिहिले आहे की, 'यांना पुन्हा पुन्हा सांगावं लागतंय हेच दुर्दैव आहे, पण तरीही सांगतोच. पाकिस्तानी कलाकार इथे खपवून घेतले जाणार नाहीत म्हणजे नाहीत, हीच मनसेची भूमिका होती, आहे आणि पुढेही राहणार. फक्त बॉलिवूडच नाही तर कोणत्याही भाषेतील चित्रपटात पाकड्यांकडून गाणं रेकॉर्ड करुन दाखवाच. हे चॅलेंज स्वीकारण्याची हिंमत कुणी करु नये, एवढाच सल्ला आत्ता देतोय.' या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी मनसे स्टाइलने थेट इशारा दिला आहे.

दरम्यान, पाकिस्तानी कलाकारांना भारतामध्ये बंदीबाबतची याचिका आधी मुंबई उच्च न्यायालयाने आणि नंतर सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. त्यानंतर पाकिस्तानी कलाकारांसाठी हिंदी चित्रपटसृष्टीने आपले दरवाजे उघडले आहेत. अतिफ अस्लम लवकरच दिग्दर्शक अमित कसारिया यांच्या 'लव्ह स्टोरी ऑफ नाइन्टीज' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार आहे. तब्बल ८ वर्षांनंतर तो बॉलिवूडमध्ये पुनरागमन करत आहे. या चित्रपटासाठी संगिनी ब्रदर्स हरेश आणि धर्मेश हे अतिफ अस्लमसोबत बोलत आहेत. हा चित्रपट संगिनी ब्रदर्स मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली तयार होणार आहे. पण आता अतिफ अस्लमसह पाकिसतानी कलाकारांना भारतामध्ये काम मिळू नये यासाठी मनसेने विरोध केला आहे.

Amey Khopkar On Arijit Singh
Poonam Pandey: 'मला पब्लिसिटीची गरज नाही', निधनाच्या अफवेनंतर ट्रोल करणाऱ्यांना पूनम पांडेने दिलं उत्तर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com