Parineeti Chopra New Look Saam Tv
मनोरंजन बातम्या

Parineeti Chopra Video: लग्नाआधीच परिणीतीवर राघवच्या प्रेमाची जादू, 'R' अक्षराच्या कॅपने वेधलं सर्वांचं लक्ष; VIDEO व्हायरल

Parineeti Chopra New Look: परिणीती चोप्राचा एक जबरदस्त व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Priya More

Parineeti Airport Look:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री परिणीती चोप्रा (Actress Parineeti Chopra) आणि आपचे खासदार राघव चड्ढा (MP Raghav Chadha) लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. दोघांच्या लग्नाची सध्या जोरदार तयारी देखील सुरु आहे. येत्या २४ सप्टेंबरला राजस्थानच्या उदयपूरमध्ये परिणीती आणि राघव लग्नगाठ बांधणार आहेत. या लग्नाची दोघांच्या चाहत्यांना खूपच उत्सुकता लागली आहे. याचदरम्यान परिणीती चोप्राचा एक जबरदस्त व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

लवकरच राघव चड्ढाची नवरी होणाऱ्या परिणीती चोप्राचा एअरपोर्ट लूक समोर आला आहे. या लूकमध्ये परिणीती खूपच सुंदर दिसत आहे. यावेळी परिणीतीने डोक्यावर घातलेल्या कॅपने सर्वांचे लक्ष वेधले. परिणीतीने घातलेल्या काळ्या रंगाच्या कॅपवर राघवच्या नावाचे पहिले अक्षर म्हणजेच इंग्रजीमध्ये 'R' असे लिहिलेले आहे. परिणीतीच्या या कस्टमाइज्ड कॅपचीच सध्या चर्चा सुरु आहे. या कॅपने सर्वांच्या नजरा आपल्याकडे खेचल्या आहेत.

परिणीती चोप्राचा हा कूल लूक सर्वांना प्रचंड आवडत आहे. तिच्या या एअरपोर्ट लूकचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नुकताच परिणीतीचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये परिणीती पापाराझींवर चिडलेली दिसत होती. परिणीतीच्या चिडण्यामागचे कारण असं होतं की, ती जेव्हा आपल्या कारमधून खाली उतरली तोवरच पापाराझींनी आपले कॅमरे घेऊन तिला घेरले. पापाराझींच्या या कृतीमुळे परिणीतीचा पारा चढला आणि ती संतापली.

संतापलेल्या परिणीतीने पापाराझींना चांगलेच सुनावले. 'मी तुम्हाला बोलावलं नाही तरी तुम्ही इथे का आलात?'असा सवाल तिने त्यांना केला. त्याचसोबत, 'सर बस करा, मी तुमचा आदर करते' असे बोलून परिणितीने पापाराझींसमोर हात जोडले. त्यानंतर पापाराझी देखील तिला सॉरी म्हणाले. परिणीतीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

राघव आणि परिणीती २४ सप्टेंबर रोजी उदयपूरच्या 'द लीला पॅलेस'मध्ये सात फेरे घेणार आहेत. यानंतर हे कपल ३० सप्टेंबर रोजी 'ताज लेक' येथे त्यांच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी देणार आहेत. २३ सप्टेंबरपासून त्यांच्या लग्नाच्या विधीला सुरुवात होणार आहे. याच हॉटेलमध्ये पाहुण्यांच्या राहण्याची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. दोघांच्याही लग्नाबाबत एकएक अपडेट्स समोर येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

Maharashtra Live News Update: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे शिवतीर्थावर जाणार

SCROLL FOR NEXT