Mouni Roy Dance Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Mouni Roy Video: मौनी रॉयचा मिनी ड्रेसमध्ये हॉट अंदाज, डान्स करतानाचा VIDEO आला समोर

Mouni Roy Dance Video: नुकताच मौनी रॉयचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Viral Video) होत आहे.

Priya More

Mouni Roy Dance Video:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री मौनी रॉय (Actress Mouni Roy) आपल्या हटके स्टाईल आणि ग्लॅमरस लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर सक्रीय असणारी मौनी रॉय प्रत्येक वेळी नवीन नवीन लूकमधील फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तिचे हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात. नुकताच मौनी रॉयचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Viral Video) होत आहे. या व्हिडिओमध्ये मौनीचा कातिल अंदाज सर्वांना पाहायला मिळत आहे.

मौनी रॉयने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून या लूकमधील फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहे. मौनी रॉयने या व्हिडिओ आणि फोटोमध्ये डिझायनर शॉर्ट वनपीस परिधान केला आहे. मौनी या लूकमध्ये खूपच हॉट दिसत आहे. मौनीने कातिल अंदाज दाखवत जबरदस्त डान्स मूव्स देखील केले आहेत. मौनीच्या या ड्रेसवर हिऱ्यांची डिझाइन तयार करण्यात आले आहे.

डिप नेक असलेल्या या ड्रेसमधील मौनीचा किलर लूक चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. या व्हिडीओमध्ये मौनी रॉय इंग्रजी गाण्यावर जबरदस्त पोझ देताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत मौनीने कॅप्शनमध्ये 'A Lil' असे लिहिले आहे. मौनी रॉयच्या या व्हिडिओला तिच्या चाहत्यांनी चांगली पसंती दिली असून ते कमेंट्स करत तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत. मौनीच्या हा हॉट व्हिडीओमुळे सोशल मीडियाचे तापमान चांगलेच वाढले आहे.

दरम्यान, अभिनेत्री मौनी रॉयने एकता कपूरच्या 'क्यूँकी सास भी कभी बहू थी' या मालिकेमधून आपल्या करिअरची सुरुवात केली. मौनीने टेलिव्हिजनपासून बॉलीवूडपर्यंतचा बराच पल्ला गाठला आहे. 'नागिन' या मालिकेतून मौनी रॉय घराघरात पोहचली. यानंतर तिने अक्षय कुमारसोबत 'गोल्ड' आणि अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटामध्ये काम केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT