Madhuri Dixit Singing Video Song of Ed Sheeran SaamTv
मनोरंजन बातम्या

Madhuri Dixit Singing Video: 'धक-धक गर्ल'च्या मधूर आवाजाने लावलं वेड, Madhuri Dixit ने पतीसोबत गायलं एड शीरनचे सुपरहिट गाणं; VIDEO व्हायरल

[Watch] Madhuri Dixit And Shriram Nene Sings Song of Ed Sheeran: माधुरी दीक्षितचा आवाज देखील खूपच मधूर आहे. माधुरीचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती पती श्रीराम नेनेसोबत गाणं गाताना दिसत आहे.

Priya More

Madhuri Dixit Singing Video:

बॉलिवूडची (Bollywood) 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आजही ग्लॅमरच्या जगामध्ये सक्रीय आहे. 90 च्या दशकातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असलेल्या माधुरी दीक्षितच्या सौंदर्याची आणि फिटनेसची आजही चर्चा होते. आपल्या दमदार अभिनय शैली आणि स्टाइलच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या मनावर आजही राज्य करते. पण यावेळी माधुरी दीक्षित तिच्या लूक किंवा अभिनयामुळे चर्चेत आली नाही तर यावेळी ती गाण्यामुळे चर्चेत आली आहे. माधुरी दीक्षितचा आवाज देखील खूपच मधूर आहे. माधुरीचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती पती श्रीराम नेनेसोबत गाणं गाताना दिसत आहे. (Bollywood News)

माधुरी दीक्षित गाण्यामुळे लाइमलाइटमध्ये आली आहे. माधुरी दीक्षितचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. माधुरी दीक्षित पती डॉ. श्रीराम नेने यांच्यासोबत गाणं गाताना दिसते. श्रीराम नेने यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये माधुरी दीक्षित एका पार्टीत गाणे गाताना दिसत आहे. त्यानंतर माधुरीसोबत तिचे पती डॉ. नेने देखील गाणं गाताना दिसतात. माधुरी दीक्षितचा गाण्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. नेटकरी माधुरी दीक्षितचे कौतुक करत आहेत.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, काळ्या आणि सोनेरी रंगाच्या गाऊनमध्ये माधुरी दीक्षित दिसत आहे. यावेळी माधुरी हातामध्ये माइक घेऊन हॉलिवूड सिंगर एड शीरनचे सर्वात लोकप्रिय गाणं गाताना दिसत आहे. अतिशय मधुर आवाजामध्ये ती हे गाणं परफेक्ट गाताना दिसत आहे. तसंच, एक पियानो वादक माधुरीच्या शेजारी बसलेला दिसत आहे. माधुरी माइक धरून गाणे गात आहे. तेवढ्यात डॉ. नेने देखील तिच्यासोबत गाणं गायला लागतात. दोघेही खूपच सुंदर पद्धतीने हे गाणं गात इन्जॉय करताना दिसत आहे.

श्रीराम नेने यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला असून त्याला सुंदर कॅप्शन देखील दिले आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, 'परफेक्ट हे गाणे नेहमीच आमच्या आवडत्या गाण्यांपैकी एक आहे. #EdSheeran चे हे गाणे गाताना खूप मजा आली.' दरम्यान, माधुरी दीक्षितच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, माधुरीची नेटफ्लिक्स सीरिज 'द फेम गेम' काही दिवसांपूर्वी रिलीज झाली होती. या सीरिजमध्ये माधुरी सुपरस्टारच्या भूमिकेत दिसली होती. सध्या माधुरी दीक्षित डान्स रिॲलिटी शो 'डान्स दिवाने'मध्ये जजच्या भूमिकेत दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Arya Encounter Mystery: रोहित आर्यचा एन्काऊंटर की हत्या? रोहितच्या वकिलाच्या दाव्यानं खळबळ

Sikandar Shaikh Arrest: पहिलवान सिकंदर शेखला अटक; पोलिसांच्या कारवाईने कुस्ती क्षेत्रात खळबळ|VIDEO

Mumbai Crime : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई; बीएमसी अधिकाऱ्याला रंगेहाथ अटक

वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताची धडक, 7 वेळा विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला चारली धूळ

Crime News : आई की कसाई? बॉयफ्रेंडसाठी एकुलत्या एक मुलाची हत्या, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT