Kangana Ranaut On Bollywood Celebrities  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kangana Ranaut: इमानदारीने पैसा कमवा..., अंबानींच्या पार्टीमध्ये डान्स करणाऱ्या बॉलिवूड सेलिब्रिटींवर कंगना रनौत संतापली

Kantana Ranaut Angry On Bollywood Celebrities: कंगना रनौते अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंगला गेलेल्या बॉलिवूड सेलिब्रिटींवर निशाणा साधला आहे. अंबानींच्या पार्टीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होणाऱ्या बॉलिवूड सेलिब्रिटींची कंगनाने चांगलीच शाळा घेतली.

Priya More

Anant Ambani And Radhika Merchant Pre-Wedding:

बॉलिवूडची (Bollywood) अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) नेहमी या नाही तर त्या कारणांमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर सक्रीय असणारी कंगना रनौत स्पष्टपणे आपल मत मांडत असते. मग तो मुद्दा कोणताही असो. कितीही ट्रोल केलं, वादात अडकली तरी देखील कंगना रनौत आपले मत मांडायला मागे हटत नाही. अशामध्येच आता कंगना रनौतने अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंगला गेलेल्या बॉलिवूड सेलिब्रिटींवर निशाणा साधला आहे. अंबानींच्या पार्टीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होणाऱ्या बॉलिवूड सेलिब्रिटींची कंगनाने चांगलीच शाळा घेतली.

कंगना रनौतने यासंदर्भात सोशल मीडिया पोस्ट करत बॉलिवूड सेलिब्रिटींना खडेबोल सुनावले आहे. कंगना रनौतची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. कंगना रनौत आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरील स्टोरीवरून एक पोस्ट शेअर केली आहे. कंगना रनैतने या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, 'मी खूप आर्थिक संकटाचा सामना केला आहे पण लताजी आणि मी असे दोनच व्यक्ती आहोत ज्यांची गाणी ('फॅशन का जलवा', 'घनी बावरी हो गयी', 'लंडन ठुमकदा', 'साडी गली', 'विजय भवं' इ.) सर्वाधिक हिट झाली आहेत. पण मला पैशाचा कितीही मोह झाला तरी लग्नसोहळ्यात मी कधीच नाचले नाही.'

या पोस्टमध्ये कंगनाने पुढे असे लिहिले की, 'अनेक सुपरहिट गाणीही मला ऑफर झाली होती. पण मी नकार दिला. अवॉर्ड शोपासूनही मी दूर राहिले. प्रसिद्धी आणि पैशाला नाही म्हणायला मजबूत व्यक्तिमत्व आणि प्रतिष्ठा लागते. शॉर्ट कटच्या जगात, आजच्या तरुणांनी हे समजून घेणे आवश्यक आहे की फक्त इमानदारीने पैसे कमवावा.' कंगना रनौतने या पोस्टमध्ये कोणत्याही बॉलिवूड स्टारचे नाव घेतलेले नाही.

नुकताच मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीचे प्री-वेडिंग फंक्शन गुजरातमधील जामनगर येथे पार पडले. या कार्यक्रमात बॉलिवूडच्या अनेक स्टार्सनी हजेरी लावली. १ ते ३ मार्च दरम्यान हा कार्यक्रम सुरू होता. या कार्यक्रमात बॉलिवूड सेलिब्रिटींनी खूप धम्माल केली. त्यांनी या कार्यक्रमामध्ये डान्स देखील केले. या सेलिब्रिटींचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Kangana Ranaut Post

कंगना रनौतच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, कंगना रनौत 'इमर्जन्सी' चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट 14 जून 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. 'इमर्जन्सी' चित्रपटात कंगना रनौत माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे. कंगना शेवटची 2023 मध्ये रिलीज झालेल्या 'तेजस' चित्रपटात दिसली होती. कंगना रनौतचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dearness Allowance: मोठी बातमी ! राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांना होळीचं गिफ्ट; ८ लाख निवृत्ती वेतनधारकांनाही होणार मोठा आर्थिक फायदा

IND vs ZIM T20 WC: झिम्बाब्वेचा दारूण पराभव; भारत उपांत्य फेरीपासून एक पाऊल दूर; हार्दिक बनला विजयाचा हिरो

रश्मिका मंदाना अन् विजय देवरकोंडा अकडले लग्न बंधनात; कपलची एक कृती ठरली चर्चेचा विषय

Rajya Sabha Election: उद्धव ठाकरे राज्यसभेवर जाणार? मविआमध्ये पडद्यामागे काय घडतेय?

Zilla Parishad: जिल्हा परिषद अन् पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर सदस्यांबाबत सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT