Kangana Ranaut Saam Digital
मनोरंजन बातम्या

Kangana Ranaut: CISF जवानाने कंगना रणौतच्या कानशिलात लगावली?, चंदीगड एअरपोर्टवर नेमकं काय घडलं?

Kangana Ranaut Got Slapped By CISF Jawan At Chandigarh Airport: चंदीगड विमानतळावर सीआयएसएफच्या महिला जवानाने कंगना रणौतच्या कानशिलात लगावल्याची बातमी समोर आली आहे. याप्रकरणी तिने एअरपोर्ट पोलिस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली आहे.

Priya More

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत सध्या चर्चेत आली आहे. कंगना रणौत मंडी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकली असून ती आज दिल्लीला रवाना झाली. चंदीगड विमानतळावर सीआयएसएफच्या महिला जवानाने कंगना रणौतच्या कानशिलात लगावल्याची बातमी समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा अभिनेत्री कंगना रणौत चंदिगड विमानतळावर पोहोचली तेव्हा एका महिला सीआयएसएफच्या महिला जवानाने अभिनेत्रीच्या कानशिलात लगावली. यानंतर कंगना रणौतने विमानतळ पोलिसांकडे या महिला जवानाच्याविरोधात तक्रार दाखल केली.

कंगना रणौतने काही वेळापूर्वी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम स्टोरीजवर तिच्या कारमधील फोटो शेअर केले होते. या पोस्टद्वारे तिने दिल्लीला निघाल्याची माहिती शेअर केली होती. दिल्लीला जाण्यासाठी कंगना रणौत चंदीगड एअरपोर्टवर पोहचली. त्यावेळी एका महिला सीआयएसएफ जवानाने अभिनेत्रीच्या कानशिलात लगावली. यानंतर कंगना राणौतने विमानतळ पोलिसांकडे याप्रकरणी तक्रार दाखल केली.

मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी आंदोलनातील महिला शेतकऱ्यांसंदर्भात कंगना रणौतने वक्तव्य केले होते. तिच्या वक्तव्यामुळे दुखावलेल्या सीआयएसएफच्या महिला जवान कुलविंदर कौरने अभिनेत्रीच्या कानशिलात लगावली. कंगना रणौत सुरक्षा तपासणीसाठी पुढे गेली असता महिला जवानाने तिच्या कानशिला लगावली. या घटनेनंतर कंगनाने महिला जवानाविरोधात तक्रार दाखल केली. अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर कुलविंदर कौर यांना कमांडंटच्या खोलीत बसवण्यात आले. त्यानंतर महिला जवानाला ताब्यात घेण्यात आले.

या घटनेनंतर अभिनेत्री कंगना रणौत दिल्लीसाठी रवाना झाली आहे. चंदीगड विमानतळावर कंगना राणौतसोबत अशी घटना पहिल्यांदाच घडली नाही. चार वर्षांपूर्वीही चंदीगड विमानतळावर अभिनेत्रीसोबत अशीच घटना घडल्याची बातमी समोर आली होती. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. ही बातमी समोर येताच कंगणाचे चाहते संतप्त झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: बारामतीमध्ये जय पवार बाईक रॅलीमध्ये सहभागी

१२ डिसेंबरपासून राजासारखं आयुष्य जगणार 'या' राशी; आर्थिक फायद्यासह चांगल्या संधीही मिळणार

Cotton Price : कापसाला मिळाला साडेसात हजाराच्यावर दर; पहिल्याच दिवशी २५०० क्विंटलची आवक

Kashmera Shah Accident: कृष्णा अभिषेकच्या पत्नीचा परदेशात झाला भीषण अपघात, फोटो शेअर करत म्हणाली, जखमांचे व्रण...

GRAP-4 लागू करण्यास तीन दिवसांचा विलंब का? दिल्लीतील प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने घेतला कठोर निर्णय

SCROLL FOR NEXT