Aamir Khan And Genelia Dsouza Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sitaare Zameen Par Movie: 'सितारे जमीन पर'मध्ये जेनेलिया डिसुझाची एन्ट्री?, आमिर खानसोबत पहिल्यांदाच करणार स्क्रिन शेअर

Bollywood Actress Genelia Dsouza: आमिर खानने 'सितारे जमीन पर' चित्रपटाची घोषणा केली तेव्हापासून या चित्रपटाची स्टारकास्ट, कथा आणि रिलीज डेटबद्दल चर्चा सुरू झाली आहे.

Priya More

Sitaare Zameen Par:

बॉलीवूडचा (Bollywood) 'मिस्टर परफेक्शनिस्ट' म्हणजेच अभिनेता आमिर खानने (Aamir Khan) नुकताच त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली. आमिर खान लवकरच 'सितारे जमीन पर' हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

आमिर खानने 'सितारे जमीन पर' चित्रपटाची (Sitaare Zameen Par Movie) घोषणा केली तेव्हापासून या चित्रपटाची स्टारकास्ट, कथा आणि रिलीज डेटबद्दल चर्चा सुरू झाली आहे. आता या चित्रपटाशी संबंधित एक अपडेट समोर आली आहे. रितेश देशमुखची (Riteish Deshmukh) पत्नी आणि बी टाऊन अभिनेत्री जेनिलिया डिसूजाची (Genelia D'Souza) या चित्रपटामध्ये एन्ट्री होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

आमिर खानने एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीदरम्यान त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव सांगितले होते. आमिर खानने चित्रपटाचे नाव सांगत या चित्रपटाचे 'तारे जमीन पर' या त्याच्या सुपरहिट चित्रपटाशी खास संबंध असल्याचे सांगितले होते. आमिर खानने सांगितले की, 'तारे जमीन पर' हा भावनिक चित्रपट आहे आणि त्याचप्रमाणे 'सीतारे जमीन पर' हा एक मनोरंजक चित्रपट असणार आहे. सुपरस्टारचा हा पुढचा चित्रपट देखील २००७ मध्ये आलेल्या 'तारे जमीन पर'च्या थीमवर असणार आहे. या चित्रपटात ९ जण मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री जेनिलिया डिसूजा आमिर खानच्या 'सितारे जमीन पर' या चित्रपटात दिसणार असल्याचे बोलले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण असे झाले तर आमिर खान आणि जेनिलिया डिसूझा यांना पहिल्यांदाच पडद्यावर रोमान्स करताना लोकांना पाहायला मिळणार आहे.

दरम्यान, आमिर खान २०२२ मध्ये 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटात शेवटी दिसला होता. ज्यामध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री करीना कपूर मुख्य भूमिकेत होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. त्यामुळे आमिरला मोठा धक्का बसला. त्यानंतर त्याने काही काळ अभिनयातून ब्रेक घेतला आणि कोणताही प्रोजेक्ट साइन केला नाही. काही दिवसांपूर्वी आमिरने सनी देओलच्या 'लाहोर १९४७' या चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटाची चर्चा सुरू असताना आता त्याने 'सितारे जमीन पर' या आणखी एका चित्रपटाची घोषणा केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT