Deepika Padukone And Ranveer Singh 
मनोरंजन बातम्या

Deepika Padukone: संघर्षाचे दिवस आठवत दीपिका पदुकोण झाली इमोशनल, रणवीरसोबतच्या नात्याबाबत केला मोठा खुलासा

Deepika Padukone Struggling Life: अभिनेत्री आज इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. पण दीपिकाचा इथपर्यंतचा प्रवास इतका सोपा नव्हता.

Priya More

Deepika Padukone On Ranveer Singh Relationship:

दीपिका पदुकोणचे (Deepika Padukone) नाव आज बॉलिवूडच्या (Bollywood) टॉप अभिनेत्रींमध्ये घेतले जाते. दीपिकाने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले असून केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्येही (Hollywood) तिने आपली जादू दाखवली आहे. ही अभिनेत्री आज इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. पण दीपिकाचा इथपर्यंतचा प्रवास इतका सोपा नव्हता. तिने चित्रपटात येण्यापूर्वी खूप संघर्ष केला आहे. याचा खुलासा खुद्द अभिनेत्रीने केला आहे.

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग (Ranveer Singh) यांच्या लग्नाला ५ वर्षे पूर्ण झाली आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते दोघांनाही लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत आहेत. दीपिका आणि रणवीर १४ नोव्हेंबर २०१८ मध्ये विवाहबंधनात अडकले. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त दीपिका पदुकोणची एक मुलाखत व्हायरल होत आहे. या मुलाखतीत दीपिका पदुकोण तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोकळेपणाने बोलताना दिसली. यासोबतच या अभिनेत्रीने संघर्षाच्या दिवसांबद्दलही सांगितले. दीपिका पदुकोणची ही मुलाखत सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.

दीपिका पदुकोणने वोगला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये दीपिकाने तिच्या संघर्षाचे दिवस आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत. दीपिकाने सांगितले की, 'अनेकदा रणवीर आणि मी एकाच शहरात असतानाही एकत्र वेळ घालवू शकत नाही. आम्हा दोघांना एकत्र वेळ घालवण्यासाठी शेड्युलिंग आणि प्लॅनिंग करावे लागेल. आमचा बहुतेक वेळ प्रवासात जातो. कधी रणवीर रात्री उशिरा घरी येतो, तर कधी मी सकाळी लवकर घरातू निघून जाते. मला रणवीरसोबत वेळ घालवायला मजा येते.'

यावेळी दीपिका तिच्या संघर्षाचे दिवस सांगत इमोशनल झाली. तिने सांगितले की, 'मी शहरात नवीन असताना बॅग घेऊन इकडे तिकडे फिरायचे. अनेक वेळा मी संपूर्ण दिवस कॅबमध्ये घालवायचे आणि मी कॅबमध्येच झोपायचे. माझ्या आईला फक्त मी सुरक्षितपणे घरी पोहोचण्याची काळजी होती. मी जे काही केले ते मी स्वतः केले.' दरम्यान, दीपिका पादुकोन लवकरच साऊथचा सुपरस्टार प्रभाससोबत कल्की '2898 एडी' या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय 'फायटर' या चित्रपटात ती हृतिक रोशनसोबत काम करताना दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी निमित्त खास माहिती, चंदनाचा टीका लावल्याचे फायदे

Ex Boyfriend zodiac sign: एक्स बॉयफ्रेंड तुमच्या आयुष्यात पुन्हा डोकावतोय? राशीनुसार जाणून घ्या त्याचा प्लान

Sushil Kedia: ठाकरेंची माफी मागून केडियानं पुन्हा पलटी मारली; म्हणाला 'काय बोललो याचा पश्चाताप नाही'

CHYD : 'चला हवा येऊ द्या' महाराष्ट्राला खळखळून हसवायला सज्ज; कॉमेडीचं गँगवॉर 'या' दिवसापासून सुरू, पाहा VIDEO

दारूचे पैसे न दिल्याने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण; घटना CCTVत कैद

SCROLL FOR NEXT