Bipasha Basu Birthday Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bipasha Basu Birthday: डॉक्टर व्हायचं होतं पण..., बिपाशा बसूला आजही होतो शिक्षण सोडल्याचा पश्चाताप

Bipasha Basu Bday Special : बिपाशाने 2001 मध्ये आलेल्या 'अजनबी' या थ्रिलर चित्रपटात अक्षय कुमारसोबत नकारात्मक भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेला खूप चांगली पसंती मिळाली होती.

Priya More

Bipasha Basu Movie:

बॉलिवूडची (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री बिपाशा बसू (Bipasha Basu) आज आपला 45 वा वाढदिवस साजरा करत आहे. बिपाशा बसू ही बॉलिवूडची अशी अभिनेत्री आहे जी या वयातही फिटनेस आणि सौंदर्याच्या बाबतीत सर्वांना आश्चर्यचकित करते. बिपाशाने बॉलिवूडमध्ये तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात नकारात्मक भूमिकांमधून केली होती.

बिपाशाने 2001 मध्ये आलेल्या 'अजनबी' या थ्रिलर चित्रपटात अक्षय कुमारसोबत नकारात्मक भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेला खूप चांगली पसंती मिळाली होती. तिचा हा चित्रपट इतका सुपरहिट झाला की तिला बेस्ट फीमेल डेब्यूचा फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला होता. बिपाशा बसूच्या वाढदिवसानिमित्त (Bipasha Basu Birthday) आज आपण तिच्या करिअर, शिक्षणाबद्दल जाणून घेणार आहोत...

बिपाशा बसू ही बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्यापूर्वी मॉडेलिंग करत होती. फार कमी लोकांना माहित असेल की तिने मॉडेलिंगमध्ये करिअर करण्याचा विचार केला नव्हता. परंतु इतर स्टार्सप्रमाणेच तिच्या नशिबीही तेच करायचे होते. यामागेही एक रंजक कथा आहे. कोलकाता येथील एका हॉटेलमध्ये बिपाशाची भेट मॉडेल आणि अर्जुन रामपालची एक्स वाइक मेहर जेसियाशी झाली. मेहरने बिपाशाला मॉडेलिंग करण्याचा सल्ला दिला. बिपाशाला डॉक्टर व्हायचे होते. बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तिला मेडिकल स्ट्रीममध्ये प्रवेश घ्यायचा होता. महत्वाचे म्हणजे बिपाशा बसूला तिच्या शाळेतील मैत्रिणी प्रेमाने ‘लेडी डॉन’ म्हणायच्या.

2006 मध्ये आलेल्या 'कॉर्पोरेट' (2006) चित्रपटासाठी बिपाशा बसू निर्मात्यांची फर्स्ट चॉइस नव्हती. ही भूमिका सर्वप्रथम ऐश्वर्या रायला ऑफर करण्यात आली होती परंतु काही कारणास्तव तिने चित्रपट करण्यास नकार दिला आणि त्यानंतर बिपाशा बसूची निवड करण्यात आली. या चित्रपटात तिने ऐश्वर्या रायच्या जागी तुलजाची भूमिका साकारली होती. त्या दिवसांत ऐश्वर्या रायकडे प्रोजेक्ट खूप होते. तिच्या डेट देखील फायनल झाल्या होत्या. त्यामुळे तिने 'कॉर्पोरेट'साठी नकार दिला होता.

बिपाशा बसूने अगदी लहान वयातच मॉडेलिंगला सुरुवात केली होती. ग्लॅमरस करिअर करण्यासाठी तिला अभ्यास सोडल्याचाही पश्चाताप होतो. हॉलिवूड स्टार ब्रॅड पिटवर तिचा मोठा क्रश असल्याचे बिपाशाने मान्य केले होते. ती एकदा म्हणाली होती, 'त्याचा फक्त स्वतःवर विश्वास असला पाहिजे आणि जर तो ब्रॅड पिटसारखा दिसत असेल तर ते खूप छान होईल.' बिपाशा अॅक्रोफोबिक आहे. एका मुलाखतीत तिने सांगितले होते की तिला उंचीची भीती वाटते. 2011 मध्ये टाइम्सच्या 50 मोस्ट डिझायरेबल महिलांमध्ये बिपाशा 8व्या आणि 2012 मध्ये 13व्या स्थानावर होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Online Shopping: चुकूनही या 3 वस्तू ऑनलाईन खरेदी करू नका , पैसे जातील वाया

Gulab Jamun Recipe: तोंडात टाकताच विरघळणारा खव्याचा गुलाबजाम कसा बनवायचा? वाचा ही सिक्रेट रेसिपी

Maharashtra Live News Update : ऐन सणासुदीचा काळात सातपुड्यातील चांदसैली बनला मृत्यूचा घाट

मुंबई -पुणे मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७-८ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा|VIDEO

Narak Chaturdashi 2025: नरक चतुर्दशीला करा हे 5 लक्ष्मी उपाय, कर्ज आणि आर्थिक अडचणी होतील दूर

SCROLL FOR NEXT