Bhumi Pednekar Hospitalized Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bhumi Pednekar Hospitalized: अभिनेत्री भूमी पेडणेकर रुग्णालयात, फोटो शेअर करत म्हणाली - एका मच्छराने...

Bhumi Pednekar Photos: भूमीने चाहत्यांना मच्छरांपासून सावध राहण्याचा आणि काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

Priya More

Bhumi Pednekar:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री भूमी पेडणेकरांच्या (Bhumi Pednekar) चाहत्यांसाठी महत्वाची बातमी आहे. भूमी पेडणेकरला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. भूमीला डेंग्यूची लागण झाली असून गेल्या ८ दिवसांपासून तिला त्रास होत होता. सध्या तिच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. भूमीने स्वत: सोशल मीडियावर पोस्ट करत डेंग्यू झाल्याचे आपल्या चाहत्यांना सांगितले. त्याचसोबत तिने चाहत्यांना मच्छरांपासून सावध राहण्याचा आणि काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भूमी पेडणेकरने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हॉस्पिटलमधील काही फोटो शेअर केले आहेत. हॉस्पिटलमधील बेडवर झोपलेली भूमी पेडणेकर आपल्याला या फोटोमध्ये दिसत आहे. भूमीने हे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'डेंग्यूच्या एका डासाने मला ८ दिवस खूप त्रास दिला. पण आज जेव्हा मी उठले तर मला जरा बरे वाटले. त्यामुळे सेल्फी घेण्याचा विचार केला.'

तसंच, 'मित्रांनो... तुम्ही सर्व सावध रहा. गेले काही दिवस माझ्या कुटुंबासाठी खूप कठीण गेले. मच्छर प्रतिबंधकचा वापर करा. तुमची रोग प्रतिकारशक्ती वाढवा. प्रदूषणामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती खराब झाली आहे. माझ्या ओळखीच्या अनेकांना डेंग्यूचा त्रास झाला आहे. या विषाणूमुळे परिस्थिती आणखी बिघडली. माझी काळजी घेतल्याबद्दल डॉक्टरांचे खूप खूप आभार.', असं या पोस्टमध्ये भूमीने लिहिले आहे.

भूमी पेडणेकरने इन्स्टा स्टोरीवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती खूपच अशक्त दिसत आहे. भूमीने हे फोटो शेअर करताच चाहत्यांना तिची काळजी वाटू लागली आणि त्यांनी अभिनेत्रीच्या बरे होण्यासाठी प्रार्थना करण्यास सुरुवात केली. ते भूमीच्या या पोस्टवर कमेंट्स करत तिला काळजी घेण्याचे आवाहन करत आहेत. दरम्यान,

भूमी पेडणेकर शेवटी 'थँक्स फॉर कमिंग' या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात अभिनेत्रीसोबत शहनाज गिलने देखील काम केले आहे. कंटेंटमुळे हा चित्रपट अनेकदा ट्रोलही झाला होता. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद देखील मिळाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पँटची चैन उघडली अन्..., ट्रेनमध्ये तरुणीकडे पाहून तरुणाचं अश्लील कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

Maharashtra Live News Update: अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या झाडाझडतीत एकाकडे सापडली पिस्तुल

Fake Charger: मोबाईल चार्जर खरे आहे का बनावट? खरेदी करताना ‘हे’ तपशील नक्की तपासा

Deepika Padukone Fitness: प्रेग्नेसीनंतर दीपिका पादुकोण इतकी फिट कशी? पाहा आताचे नवीन फोटो

Bank Rule: ग्राहकांना दिलासा! किमान बॅलेंस नसेल तरीही भरावा लागणार नाही दंड; या बँकांचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT