Athiya Shetty Pregnancy Rumors Saam Tv
मनोरंजन बातम्या

Athiya Shetty Pregnant: खरंच आथिया शेट्टी आणि केएल राहुल आई-बाबा होणार आहे का?, सुनील शेट्टींनी सांगितलं सत्य

Athiya Shetty Pregnancy Rumors: अथिया शेट्टीचे वडील सुनील शेट्टीने 'डान्स दिवाने' या डान्स रिॲलिटी शोमध्ये 'आजोबा' बनण्याच्या प्रश्नावर असे उत्तर दिले की, अभिनेत्रीच्या प्रेग्नेंसीच्या बातमीने आणखीनच खळबळ उडवून दिली.

Priya More

Athiya Shetty And KL Rahul:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सुनील शेट्टीची (Suniel Shetty) मुलगी आणि अभिनेत्री अथिया शेट्टीने (Athiya Shetty) 2023 मध्ये टीम इंडियाचा क्रिकेटर केएल राहुलसोबत (KL Rahul) लग्न केले. तेव्हापासून आथिया शेट्टी आणि केएल राहुल सोशल मीडियावर चर्चेत असतात. एकीकडे केएल राहुल आयपीएलमध्ये टीम लखनऊ जायंट्समध्ये चांगली कामगिरी करत आहे. तर दुसरीकडे चाहते त्याला बाब होणार असल्यामुळे शुभेच्छा देत आहेत.

अथिया शेट्टीच्या प्रेग्नेंसीच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. आधी अथिया शेट्टीने तिच्या बालपणीचा एक फोटो शेअर केला. ज्यावर नेटकऱ्यांनी कमेंट करून अभिनेत्रीला प्रग्नेंसीबद्दल प्रश्न विचारले. यानंतर अथिया शेट्टीचे वडील सुनील शेट्टीने 'डान्स दिवाने' या डान्स रिॲलिटी शोमध्ये 'आजोबा' बनण्याच्या प्रश्नावर असे उत्तर दिले की, अभिनेत्रीच्या प्रेग्नेंसीच्या बातमीने आणखीनच खळबळ उडवून दिली. आता खरंच आथिया शेट्टी प्रेग्नेंट आहे की नाही हे आज आपण जाणून घेणार आहोत...

अथिया शेट्टी आणि केएल राहुलच्या लग्नाला एक वर्षाहून अधिक काळ झाला आहे. लग्नानंतर या कपलच्या आई-बाबा होण्यावर एकामागून एक बातम्या समोर येत आहेत. नुकताच सुनील शेट्टीने यावर प्रतिक्रिया दिली आहे. 'डान्स दिवाने' या रिॲलिटी शोमधून सुनील शेट्टीला आजोबा होण्याबाबत प्रश्न विचारण्यात आले होते. ज्याला उत्तर देताना सनील शेट्टी म्हणाला की, 'पुढच्या सीझनमध्ये जेव्हा मी शोमध्ये येईन तेव्हा मी आजोबासारखा स्टेजवर फिरेन'. सुनील शेट्टीच्या या वक्तव्यानंतर अथिया शेट्टीच्या प्रग्नेंट असल्याच्या बातम्या जास्त चर्चेत आल्या.

पण स्पॉटबॉयने दिलेल्या रिपोर्टनुसार, अथिया शेट्टी अद्याप प्रग्नेंट नाही. आथियाच्या एका जवळच्या मित्राने या वेबसाइटला ही माहिती दिली आहे. 'हिंदुस्तान टाइम्स'च्या वृत्तानुसार, बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीने 'आजोबा' होण्याबाबत गमतीने म्हटले होते. ज्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आहे. आथिया शेट्टी आणि केएल राहुलने अद्याप आई-बाबा होण्याच्या वृत्तावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. केएल राहुल आणि आथिया शेट्टी यांनी जानेवारी २०२४ मध्ये आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला. त्यांनी एक रोमँटिक व्हिडीओ शेअर करत काही सुंदर क्षणांची आठवण आणि क्वालिटी टाइम इन्जॉय करताना दाखवले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पैशांनी गच्च भरलेली बॅग, हातात सिगारेट, मंत्री संजय शिरसाटांचा व्हिडिओ व्हायरल; राज्याच्या राजकारणात खळबळ | VIDEO

Maharashtra Live News Update : परभणीच्या लिमला गावात महिलांचा दारूबंदीसाठी एल्गार, विशेष ग्रामसभेत ठराव मंजूर

Red Velvet Cupcake: बर्थडे किंवा पार्टीसाठी घरच्या घरी झटपट बनवा टेस्टी रेड व्हेल्वेट कपकेक

Shubman Gill : सारा तेंडुलकरची आई शुभमन गिलसमोर बसली, रवींद्र जडेजानं चांगलीच फिरकी घेतली; पाहा Video

Kalyan Crime : धावत्या एक्स्प्रेसमध्ये अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणी आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT