...आतापर्यंत मी खूप कमी पैसे कमावत होतो, Vijay Deverakonda ने चित्रपटाच्या फीबद्दल केला धक्कादायक खुलासा

Vijay Deverakonda Movie Fees: विजय देवरकोंडाने त्याच्या फीबद्दल खुलासा केला आहे. विजय देवरकोंडाने कबुल केले की, आतापासूनच मी मार्केट व्हॅल्यू घेण्यास सुरूवात केली आहे. याआधी समंथा रुथ प्रभूच्या 'कुशी' या शेवटच्या चित्रपटापर्यंत मला खूप कमी पैसे मिळत होते.
Vijay Deverakonda
Vijay DeverakondaSaam Tv

Vijay Deverakonda Video:

साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) सध्या त्याचा अपकमिंग चित्रपट द फॅमिली स्टारमुळे चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये विजय देवरकोंडासोबत अभिनेत्री मृणाल ठाकूर मुख्य भूमिकेत आहे. दोघेही सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. नुकताच विजय देवरकोंडाने त्याच्या फीबद्दल खुलासा केला आहे. विजय देवरकोंडाने कबुल केले की, आतापासूनच मी मार्केट व्हॅल्यू घेण्यास सुरूवात केली आहे. याआधी समंथा रुथ प्रभूच्या (Samantha Ruth Prabhu) 'कुशी' या शेवटच्या चित्रपटापर्यंत मला खूप कमी पैसे मिळत होते.

विजय देवरकोंडाने आपल्या आगामी 'द फॅमिली स्टार' या चित्रपटाच्या प्रोमशन कार्यक्रमात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मोठा खुसाला केला आहेत. त्याने आपल्या फीबद्दल उघडपणे सांगितले की, 'आउटसाइडर्ससाठी पैशाला प्राधान्य का नसावे?' इंडियन एक्स्प्रेसच्या बातमीनुसार, विजय देवरकोंडा म्हणाला की, 'मी एक स्टार आहे. पण मला 'कुशी' चित्रपटापासून थोडे पैसे दिसू लागले. आउटसाइडर्स असल्याने आधी पैशाचा विचार करू नये. एखाद्याने आपली स्टाइल आणि परफॉर्मन्स मजबूत केला पाहिजे. चित्रपटातील माझे काम बोलले पाहिजे.'

'माझ्या फीबद्दल अनेकदा प्रश्न विचारले जातात. पण 'कुशी' चित्रपटापर्यंत मी फार कमी पैसे कमावत होतो. 'कुशी' नंतर मी मार्केट व्हॅल्यू घेऊ लागलो.', असे विजय देवरकोंडावे सांगतले. जेव्हा विजय देवराकोंडाला त्याच्या सध्याच्या मार्केट व्हॅल्यूबद्दल प्रश्न विचारण्यात आले. तेव्हा अभिनेत्याने सांगितले की, 'ही एक आरामदायक मार्केट व्हॅल्यू आहे.' विजयने त्याचे उत्तर पूर्ण करण्याआधीच चित्रपट निर्माते दिल राजू म्हणाले की, 'तो निर्मात्याशी बोलला आणि म्हणाला आपल्या सर्वांसाठी जे काही फायदेशीर असेल. ते मार्केट व्हॅल्यू असेल. या सर्व गोष्टींवर त्यांनी आमच्याशी चर्चा केल्याने आम्ही आणखी दोन प्रोटेक्टवर काम करत आहोत.'

Vijay Deverakonda
Maidaan Final Trailer: 'एक हृदय, एक समज, एक विचार...', अजय देवगणने वाढदिवशी चाहत्यांना दिलं गिफ्ट, 'मैदान'चा फायनल ट्रेलर रिलीज

परशुराम दिग्दर्शित 'द फॅमिली स्टार' हा चित्रपट एका कामगार वर्गाच्या नायकाची आणि त्याच्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी केलेल्या संघर्षाची कथा आहे. या चित्रपटात मृणाल ठाकूर विजय देवरकोंडासोबत मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहे. हा चित्रपट ५ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दोघांचेही चाहते त्यांच्या या चित्रपटाच्या रिलीज होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Vijay Deverakonda
Urvashi Rautela: ऋषभ पंतमुळे पुन्हा ट्रोल झाली उर्वशी रौतेला, नेमकं कारण काय?; अभिनेत्रीने ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com