Vivek Oberoi Saam Tv
मनोरंजन बातम्या

Vivek Oberoi: विवेक ओबेरायची फसवणूक करणाऱ्या चित्रपट निर्मात्याला अटक, नेमकं काय आहे प्रकरण?

Bollywood Actor Vivek Oberoi: वांद्रे हॉलिडे कोर्टाने आरोपीला ७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Priya More

Vivek Oberois Cheating Case:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) याची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी (MIDC Police) विवेक ऑबेरॉयचा माजी व्यावसायिक भागीदार आणि चित्रपट निर्माता संजय साहाला अटक केली आहे. वांद्रे हॉलिडे कोर्टाने आरोपीला ७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

विवेक ओबेरॉयची कंपनी ओबेरॉय मेगा एंटरटेनमेंट एलएलपीने जुलै महिन्यात संजय साहा, नंदिता साहा, राधिका नंदा आणि इतर भागीदारांविरुद्ध पोलीस तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी रविवारी रात्री चित्रपट निर्माता संजय साहा याला अटक केली. संजय साहाला कोर्टातून रिमांडवर घेऊन पोलीस त्याची चौकशी करत आहेत. याप्रकरणी आणखी तीन ते चार जणांना अटक होण्याची शक्यता आहे. संजय साहा हा 'हड्डी' चित्रपटाचा निर्माता आहे.

संजय साहाने विवेक ओबेरॉयची तब्बल १ कोटी ५५ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संजय साहाविरोधात भादंवि कलम ४२०, ४०६, ४०९ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. अभिनेते विवेक ओबेरॉयचे सीए देवेन बाफना यांनी आपल्या तक्रारीत आरोप केला आहे की, आरोपींनी अभिनेत्याच्या इव्हेंट मॅनेजमेंट आणि फिल्म प्रोडक्शन फर्ममध्ये नफ्याचे आश्वासन देऊन गुंतवणूक केली होती. परंतु नंतर आरोपीने हे पैसे गैरफायदा मिळविण्यासाठी वापरले.

मुंबई पोलिसांचे डीसीपी दत्ता नलावडे यांनी सांगितले की, 'जुलै महिन्यात एमआयडीसी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आनंदिता एंटरटेनमेंट एलएलपीच्या संचालकांनी पैशांची उधळपट्टी केली. आनंदिता एंटरटेनमेंट एलएलपीचे तीन संचालक आरोपी असून त्यापैकी एकाला म्हणजेच संजय साहाला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीवर विविध पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. आरोपीला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.'

विवेक ओबेरॉयने फिल्म इंडस्ट्रीमध्ये व्यवसाय करण्यासाठी २०२० मध्ये संजय साहासोबत भागीदारी केली होती. पुढे कसे आणि काय करायचे याचा निर्णय घेण्यासाठी दोघांनी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठक घेतली. बैठकीत यावर निर्णय घेण्यात आला आणि त्यानंतर संजय साहाच्या आनंदिता एंटरटेनमेंट एलएलपीच्या माध्यमातून चित्रपट बनवण्याचा निर्णय घेण्यात आला. विवेक ओबेरॉयने २०२० ते २०२१ दरम्यान वेगवेगळ्या वेळी संजय साहाच्या कंपनीत ९५ लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. त्यानंतर साहाच्या कंपनीने मार्च २०२१ मध्ये बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत चित्रपट बनवण्याची योजना आखली.

यानंतर विवेक ओबेरॉयने नवाजुद्दीनला त्याच्या कंपनीमार्फत ५१ लाख रुपये दिले. याशिवाय विवेकने लेखक आणि दिग्दर्शकाला पैसेही दिले होते. हा चित्रपट बनवल्यानंतर विवेकला तो ओटीटीवर प्रदर्शित करण्याची चिंता होती. ओबेरॉय आणि संजय यांच्यात संभाषण सुरू असतानाच संजय साहाने त्याच्या वैयक्तिक कामासाठी आनंदिता एंटरटेनमेंट एलएलपीकडून काही पैसे काढल्याचे उघड झाले. आपली फसवणूक झाल्याचे समजताच विवेक ओबेरॉयने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरण, आज पुन्हा होणार सुनावणी

Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहि‍णी अपात्र, सरकार वसूली करण्याची शक्यता

Accident: देवघरमध्ये भाविकांवर काळाचा घाला, बस-ट्रकची समोरासमोर धडक; १८ जणांचा मृत्यू

Mangalwar Upay: मंगळवारच्या दिवशी शिवभक्तांनी हनुमानाचीही करावी पुजा; हे उपाय करणं ठरेल फायदेशीर

Pune Tourism : ट्रेकिंग,सायकलिंग अन् पक्षी निरीक्षण; पुण्यातील विरंगुळ्याचे बेस्ट ठिकाण

SCROLL FOR NEXT