Vicky Kaushal as 'Sam Bahadur'  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sam Bahadur Leak: 'अ‍ॅनिमल' पाठोपाठ विकी कौशलचा 'सॅम बहादूर' ऑनलाइन लीक, चित्रपटाच्या कमाईवर होणार परिणाम

Vicky Kaushal Movie Sam Bahadur Online Leak: या चित्रपटाची कथा भारताचे पहिले फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपटामध्ये फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांची भूमिका विकी कौशलने साकारली आहे.

Priya More

Sam Bahadur Movie:

सिनेरसिकांसाठी आजचा दिवस खूपच खास आहे. आज बॉलिवूडचे (Bollywood) दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) 'अ‍ॅनिमल' चित्रपट (Animal Movie) आज रिलीज झाला. यासोबतच बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) स्टारर 'सॅम बहादूर' (Sam Bhadur Movie) चित्रपट देखील आज प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.

या चित्रपटाची कथा भारताचे पहिले फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपटामध्ये फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांची भूमिका विकी कौशलने साकारली आहे. विकी कौशलच्या भूमिकेचे सर्वजण कौतुक करत आहेत. अशामध्ये आता या चित्रपटाच्या निर्मात्यांसह संपूर्ण स्टारकास्टला मोठा धक्का बसला आहे. कारण 'अ‍ॅनिमल' पाठोपाठ 'सॅम बहादूर' हा चित्रपट देखील ऑनलाइन लीक झाला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'सॅम बहादूर' हा चित्रपट रिलीजच्या पहिल्याच दिवशी लीक झाला आहे. रिलीज होताच अवघ्या काही तासांमध्येच हा चित्रपट लीक झाल्यामुळे विकी कौशलसह सर्वांना मोठा धक्का बसला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून आणि समिक्षकांकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे निर्माते खूश आहेत. पण अशामध्येच निर्मात्यांसह कलाकारांना धक्का बसला. चित्रपट रिलीज झाल्यानंतर काही तासांतच हा चित्रपट ऑनलाइन लीक झाला. लीक झाल्यामुळे 'सॅम बहादूर' चित्रपटाच्या निर्मात्यांना मोठा झटका बसला आहे.

'सॅम बहादूर' हा चित्रपट Filmywap, TamilRockers आणि FilmyZilla वर लीक झाला आहे. या साइट्सवर विकी कौशलचा 'सॅम बहादूर' हा चित्रपट एचडी क्वालिटीमध्ये उपलब्ध असल्याचे सांगण्यात येत आहे. विकी कौशलचा चित्रपट 'सॅम बहादूर'ची आज बॉक्स ऑफिसवर रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल' चित्रपटाशी टक्कर झाली आहे. विक्की कौशलचा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. तर दुसरीकडे रणबीर कपूरच्या चित्रपटाला देखील खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.

दरम्यान, मेघना गुलजार दिग्दर्शित विकी कौशलच्या 'साम बहादूर' या चित्रपटात सान्या मल्होत्रा ​​आणि फातिमा सना शेख यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. 'सॅम बहादूर' चित्रपटात विकी कौशल फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉच्या भूमिकेत दिसत आहे. तर सान्या मल्होत्राने विकीच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. फातिमा सना शेखने भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटासाठी विकी कौशलने खूपच मेहनत घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे जिल्ह्यात घाटमाथ्यावर जोरदार पाऊस, भिडे पूल पाण्याखाली

Aare Ware Beach : पावसाळ्यात 'आरे-वारे' बीचचं सौंदर्य फॉरेनपेक्षा कमी नाही

Pune Rave Party: आधी हॉटेलची रेकी, नंतर आखला एकनाथ खडसेंच्या जावयाला अडकविण्याचा डाव; खेवलकरांच्या वकिलांचा धक्कादायक खुलासा

Beed Shocking : बीडमध्ये आणखी एक वैष्णवी जीवाला मुकली, सासरच्या छळाला कंटाळून २० वर्षीय विवाहितेने आयुष्य संपवलं

Rave Vs Party : पार्टी आणि रेव्हमध्ये काय फरक आहे?

SCROLL FOR NEXT