Sunny Deol  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sunny Deol Border 2 Fees: 'गदर २' हिट होताच सनी देओलने वाढवली फी, 'बॉर्डर २'साठी वसुल केली मोठी रक्कम

Sunny Deol Hike Fees: सनी देओलच्या 'गदर २' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींपेक्षा अधिक कमाई केली.

Priya More

Sunny Deol Fees:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सनी देओलच्या (Sunny Deol) 'गदर 2' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. गदर चित्रपटाचा हा दुसरा पार्ट २२ वर्षांनंतर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

सनी देओलच्या 'गदर २' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींपेक्षा अधिक कमाई केली. 'गदर 2' नंतर आता सनी देओल लवकरच नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे बोलले जात आहे.

सनी देओल 'बॉर्डर 2' (Border 2) चित्रपटामध्ये काम करणार असल्याचे सांगितले जात आहे. चित्रपटाबाबत एकामागून एक अपडेट्स समोर येत आहेत. अशामध्ये 'बॉर्डर 2' मधून सनी देओलशी संबंधित एक मोठे अपडेट समोर आले आहे. या चित्रपटासाठी सनी देओल किती फी घेत आहे ही माहिती समोर आली आहे. सनी देओलने 'बॉर्डर 2'साठी आकारलेल्या फीचा आकडा ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

'गदर 2' हिट झाल्यापासून बॉलिवूड अभिनेता सनी देओल चांगलाच चर्चेत आहे. 'गदर 2' हिट होताच सनी देओलने आपली फी वाढवली आहे. नुकताच मीडिया रिपोर्ट्समध्ये सनी देओलच्या आगामी 'बॉर्डर 2' या चित्रपटाची फीस समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, सनी देओल या चित्रपटासाठी 50 कोटींहून अधिक मानधन घेत आहे. पण या बाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'गदर 2' च्या तुलनेत सनी देओलच्या फीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. सनी देओलने 'गदर 2'साठी 20 कोटी रुपये फी घेतली होती. आता त्याने 'बॉर्डर 2'साठी ५० कोटी म्हणजे तब्बल ३० कोटी रुपयांनी फी वाढवल्याचे दिसून येत आहे. 'बॉर्डर 2' हा सनी देओलच्या 1997 मध्ये आलेल्या सुपरहिट चित्रपट 'बॉर्डर'चा दुसरा भाग आहे. या चित्रपटात भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध दाखवण्यात आले आहे. आता चाहते 'बॉर्डर 2'ची आतुरतेने वाट पाहत आहेत. 2024 पासून 'बॉर्डर 2'चे शूटिंग सुरू होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs RR, IPL 2026: वैभव सूर्यवंशीची फटकेबाजी अन् आर्चरच्या भेदक गोलंदाजी पुढे हैदराबाद गारद; आता गुजरातशी भिडणार राजस्थान

नागपूरमध्ये इबोलाचा अलर्ट; युगांडावरून आलेला नागरिक होम आयसोलेशनमध्ये

Mumbai Crime: मुंबईत रक्तरंजित थरार! रिक्षाचालक समजून दुसऱ्यालाच संपवलं, धारदार शस्त्राने वार करत हत्या

ठाणेकरांची चिंता वाढली; बारवी धरणात फक्त इतकाच पाणीसाठा शिल्लक

Accident: भरधाव डंपरची रिक्षाला धडक, ५ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT