Dunki Drop 6 Banda Song Saam Tv
मनोरंजन बातम्या

Dunki Drop 6 Banda: किंग खानच्या 'डंकी'मधील 'बंदा' गाणं रिलीज, दिलजीत दोसांझच्या आवाजातील गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Banda Song Out: या चित्रपटातील आधी रिलीज झालेल्या 'लुटपुट गया', 'निकले थे कभी हम घरसे' आणि 'ओ माही' ही गाणी प्रेक्षकांना प्रचंड आवडली. आता या चित्रपटातील 'बंदा' हे गाणं रिलीज करण्यात आले आहे.

Priya More

Dunki Movie:

बॉलिवूडचा (Bollywood) 'किंग खान' अर्थात अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) स्टारर 'डंकी' चित्रपट (Dunki Movie) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शाहरुख खानच्या या वर्षातल्या या शेवटच्या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. सध्या या चित्रपटाची टीम प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

या चित्रपटातील आधी रिलीज झालेल्या 'लुटपुट गया', 'निकले थे कभी हम घरसे' आणि 'ओ माही' ही गाणी प्रेक्षकांना प्रचंड आवडली. आता या चित्रपटातील 'बंदा' हे गाणं रिलीज करण्यात आले आहे. शाहरुख खानने आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर पोस्ट करत या चित्रपटातील चौथं गाणं शेअर केले आहे. सध्या सोशल मीडियावर या गाण्याने धुमाकूळ घातला आहे.

नुकताच शाहरुख खानने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'डंकी' ड्रॉप 6 शेअर केला आहे. त्याने 'बंदा' गाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या गाण्याचे संगीत प्रीतम यांनी दिले असून कुमार यांचे बोल आहेत. हे गाणं पंजाबी गायक दिलजीत दोसांझने गायलं आहे. या गाण्यामध्ये शाहरुख खानचा जबरदस्त अंदाज पाहायला मिळत आहे. या गाण्यातील शाहरुख आणि तापसीचा रोमँटिक अंदाज प्रेक्षकांना प्रचंड आवडला. शाहरुख आणि तापसी लंडनला जाण्याचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी सर्व अडचणींचा कसा सामना करतात हे या बंदा गाण्याच्या माध्यमातून दाखवण्यात आला आहे. दिलजीत दोसांझच्या आवाजातील शाहरुख खानच्या या गाण्याला दोघांच्या देखील चाहत्यांनी चांगली पसंती दिली आहे.

'डंकी' मधील हे नवीन गाणं चित्रपटातील हार्डी या पात्राची ओळख करुन देत आहे. हा चित्रपट काय असेल आणि शाहरुखची व्यक्तिरेखा किती फायटर असेल हेही या गाण्यातून दिसून येत आहे. एकीकडे या गाण्यामध्ये शाहरुख आपल्या मित्रांसोबत भारतामध्ये नाचताना दिसत आहे. तर दुसरीकडे त्यांच्यासोबत तो परदेशामध्ये गेल्यावर मित्रांसोबत कोणत्या समस्यांचा सामना करतो हे या गाण्याच्या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

शाहरुख खानने इन्स्टाग्रामवर गाण्याचा व्हिडिओ शेअर करत बंदा गाणं गायलेल्या दिलजीत दोसांझचे आभार मानले आहे. त्याने गाण्याचा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'तुम जो मांग लोगे दिल तो ये जान देगा बंदा...वादों का इरादा का और अपने यारों का यार... दलजीत दोसांझ पाझीने 'बंदा' हे गाणं खूपच चांगलं गायलं आहे. त्याच्यामुळे या गाण्याला जीवदान मिळाले. थँक्यू अॅन्ड लव्ह यू पाझी...' शाहरुखच्या या पोस्टला त्याच्या चाहत्यांनी चांगली पसंती दिली आहे. या पोस्टला ६ लाखांपेक्षा अधिक जणांनी लाइक केले आहे. शाहरुखच्या पोस्टवर चाहते जोरदार कमेंट करत आहेत आणि या गाण्याचे खूप कौतुक करत आहेत. हा चित्रपट 21 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : त्र्यंबकेश्वर मंदिरात परप्रांतीय भाविकांचा राडा, दरवाजावर लाथा मारत गोंधळ घातला

Watch Video : राहुल गांधींचा व्होट चोरीवरुन निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा!

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Vivo T4 Pro भारतात लवकरच होणार लाँच, ५०MP कॅमेरा अन् खास फीचर्स, किंमत किती?

Weather Update : पावसाचा जोर वाढला! मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट जाहीर, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT