Shah Rukh Khan And Gauri Khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shah Rukh Khan ने पहिल्या व्हॅलेंटाइन डेला Gauri Khan ला काय दिलं होतं गिफ्ट?, स्वत:च केला खुलासा

Shah Rukh Khan First Valentine Gift To Gauri Khan: व्हॅलेंटाइन डे जवळ आला असून आज आपण शाहरुख आणि गौरी खानच्या लव्हस्टोरीबद्दल आणि त्याने पहिल्या व्हॅलेंटाइन डेला (Valentines Day) गौरीला काय गिफ्ट दिले होते हे जाणून घेणार आहोत...

Priya More

Shah Rukh Khan And Gauri Khan Love Story:

बॉलिवूडचा (Bollywood) 'किंग खान' अर्थात अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि त्याची पत्नी गौरी खानची (Gauri Khan) लव्हस्टोरी खूपच फिल्मी आहे. शाहरुख आणि गौरीच्या लग्नाला तीन दशकांपेक्षा जास्त काळ झाला आहे. बॉलिवूडमधील सर्वांचे आवडते आणि सर्वात जास्त चर्चेत राहणारे हे कपल आहे. सर्वांच्या आवडत्या या कपलने 1991 मध्ये लग्न केले. आता व्हॅलेंटाइन डे जवळ आला असून आज आपण शाहरुख आणि गौरी खानच्या लव्हस्टोरीबद्दल (shah rukh khan and gauri khan lovestory) आणि त्याने पहिल्या व्हॅलेंटाइन डेला (Valentines Day) गौरीला काय गिफ्ट दिले होते हे जाणून घेणार आहोत...

शाहरुख खानने २०२३ साली सोशल मीडियावर ‘आस्क एसआरके’ नावाने एक सेशन सुरू केले होते. शाहरुख खानने त्याच्या चाहत्यांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स म्हणजेच पूर्वीचे ट्विटरवर प्रश्न विचारण्यास सांगितले होते. अशा परिस्थितीत चाहतेही त्याला प्रश्न विचारण्याची संधी सोडताना दिसत नाहीयेत. शाहरुखच्या चाहत्यांनी त्यांना सुपरस्टारबद्दल पडलेले अनेक प्रश्न विचारले आणि त्याची उत्तरं देखील त्याने दिली आहेत. आता शाहरुख खानला त्याच्या चाहत्याने व्हॅलेंटाइन डे बद्दल प्रश्न विचारला होता.

शाहरुख खानच्या एका चाहत्याने त्याला विचारले होते की, 'पहिल्या व्हॅलेंटाइन डेला गौरी मॅडमला काय गिफ्ट दिले होते?' शाहरुख खानने देखील #AskSRK च्या माध्यमातून चाहत्याने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दिलं आहे. त्याने सांगितले की, 'मला बरोबर आठवत असेल तर आता ३४ वर्षे झाली आहेत... गुलाबी रंगाचे प्लास्टिकचे इअररिंग्स दिले होते असे मला वाटते...'

शाहरुख खान चित्रपटसृष्टीतील सर्वात रोमँटिक अभिनेत्यांपैकी एक मानला जातो. शाहरुख खानसोबत चित्रपटांमध्ये रोमान्स करणं हे अभिनेत्री आपलं भाग्य मानतात. 2020 मध्ये शाहरुख खानने गौरीचा हात धरलेला एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. त्याने लिहिले होते की, '36 वर्षे...आता व्हॅलेंटाईनसुद्धा आम्हाला मागायला येतो. तुम्हा सर्वांना शुभेच्छा, बंधनांच्या पलीकडे प्रेम...' शाहरुख आणि गौरी खानचे 25 ऑक्टोबर 1991 रोजी लग्न झाले. त्यांना आर्यन, सुहाना आणि अबराम असी तीन मुलं आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'Saiyara' तू तो बदला नहीं है... या ट्रेंडींग गाण्याचा अर्थ काय?

Asia Cup 2025 schedule : भारत-पाकिस्तान भिडणार, तारीख ठरली! आशिया चषक स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक

Bhaskargad : मित्रांसोबत नाशिकला गेलाय? 'भास्करगड'ची आवर्जून सफर करा

Maharashtra Live News Update: पोहण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीच्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू,नागपूरमधील घटना

Gautam Gambhir : टीम इंडियाची अवस्था 'गंभीर'; जबाबदार कोण? आकडेवारी चिंता वाढवणारी

SCROLL FOR NEXT