Salman khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Salman Khan Video: गोळीबाराच्या घटनेनंतर मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाला सलमान खान, दुबईसाठी रवाना

Salman Khan Spot On Mumbai Airport: गोळीबाराच्या घटनेमुळे सलमान खानच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेनंतर पहिल्यांदाच सलमान खान आज मुंबई एअरपोर्टवर (Mumbai Airport) स्पॉट झाला. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Priya More

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घरावर काही दिवसांपूर्वी गोळीबार झाला होता. या गोळीबाराच्या घटनेनंतर सलमान खान आणि त्याच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. सलमानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून सध्या चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे सलमान खानच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेनंतर पहिल्यांदाच सलमान खान आज मुंबई एअरपोर्टवर (Mumbai Airport) स्पॉट झाला. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सलमान खानला पापाराझींनी आज मुंबई एअरपोर्टवर स्पॉट केले. सलमान खान दुबईला रवाना झाला असल्याची माहिती समोर आली आहे. सलमान खानसोबत त्याचा बॉडीगार्डही होता. गोळीबाराच्या घटनेनंतर तो मुंबईबाहेर जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. सलमान मुंबई एअरपोर्टवर कॅज्युअल लूकमध्ये दिसला. त्याने काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि मॅचिंग पॅन्टसह सनग्लासेस घातले होते. त्याचा व्हिडिओही समोर आला असून तो व्हायरल होत आहे. अशामध्ये सलमानच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर त्याच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

सलमान खानच्या एका चाहत्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'मेगास्टार सलमान खान मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाला, तो दुबईला रवाना झाला. सलमान भाई फिट आणि चांगला दिसत आहे.' गोळीबाराच्या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी सलमानच्या घराची सुरक्षा वाढवली आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले की, सलमानच्या वांद्रे येथील निवासस्थानाबाहेर झालेल्या गोळीबारामध्ये सहभागी असलेल्या आरोपींच हेतू फक्त त्याला घाबरवण्याचा होता, त्याला मारण्याचा नाही.

मुंबई क्राइम ब्रँचच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, 'आरोपींनी पनवेलमधील सलमान खानच्या फार्महाऊसची रेकी केली होती. त्यांचा हेतू फक्त त्यांना घाबरवण्याचा होता. त्यांना मारण्याचा नव्हता. बिहारमधील आरोपींच्या दोन्ही कुटुंबांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. हरियाणा आणि इतर राज्यातून सुमारे 7 जणांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. मुंबई गुन्हे शाखा गोळीबाराशी संबंधित प्रकरणात साक्षीदार म्हणून सलमानचा जबाब नोंदवणार आहे. रविवारी या घटनेनंतर मुंबई पोलिस अधिकारी जेव्हा सलमानच्या घरी पोहोचले तेव्हा अभिनेत्याने आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: पालघरमध्ये ठाकरे गटासह बविआला खिंडार; अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

Maharashtra Live News Update: आदिती तटकरेंच्या मतदार संघात शिंदे गटाची ताकद वाढलीपदाधिकाऱ्यांची भावना

Atal Pension Yojana: या सरकारी योजनेत दर महिन्याला मिळते ₹५०००; गुंतवणूकीचं संपूर्ण कॅल्क्युलेशन वाचा

Vaidehi Parshurami Photos: लाल साडीत खुललंं वैदेही परशुरामीचं सौंदर्य, फोटो पाहा

Vande Bharat Train : मोठी बातमी! देशात आणखी ४ वंदे भारत ट्रेन सेवेत, जाणून घ्या तुमच्या शहरातून धावणार का?

SCROLL FOR NEXT