Salman Khan And Shah Rukh Khan Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Salman Khan And Shah Rukh Khan Video: बॉलिवूडच्या 'किंग खान' आणि 'सुलतान'ने घेतलं मुख्यमंत्र्यांच्या घरच्या बाप्पाचं दर्शन, VIDEO होतोय व्हायरल

Salman Khan And Shah Rukh Khan: मुख्यमंत्र्यांच्या घरच्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली.

Priya More

CM Eknath Shinde Home Ganpati Bappa:

मुंबईमध्ये सध्या गणेशोत्सवाचा (Ganesh Festival) आनंद सगळीकडे पाहायला मिळत आहे. लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी अनेक सेलिब्रिटी एकमेकांच्या घरी भेट देत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या मुंबईतील वर्षा या शासकीय निवासस्थानी गणपती बाप्पा (Ganpati Bappa) बसवण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या घरच्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. बॉलावूडचा 'किंग खान' अर्थात अभिनेता शाहरूख खान (Shah Rukh Khan) आणि 'सुलतान' म्हणजेच सलमान खान हे दोघेही मुख्यमंत्र्यांच्या घरी बाप्पाच्या दर्शनसाठी पोहचले होते.

बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि शाहरूख खान यांनी रविवारी रात्री मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भेट देत गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. शाहरूख खानसोबत त्याची मॅनेजर पूजा ददलानी उपस्थित होती. तर सलमान खानसोबत त्याची बहीण अप्रिता आणि मेहुणा आयुष शर्मा यांनी देखील बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी सर्वांनी एकत्र फोटो सेशनही केले.

सलमान खान आणि शाहरूख खान यांच्या ड्रेसिंग स्टाइलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शाहरुख खान यावेळी निळ्या रंगाचा पठाणी सूट परिधान करून पूजेसाठी आला होता. सलमानने लाल कुर्ता परिधान केला होता. तर अर्पिता लाल रंगाच्या सूटमध्ये खूपच सुंदर दिसत होती. आयुष शर्माने ब्लॅक कलरचा सूट परिधान केला होता. दोन्ही खानचे हे व्हिडीओ आणि फोटो त्यांच्या चाहत्यांना खूप आवडत आहेत.

जॅकी श्रॉफ, अर्जुन रामपाल, आशा भोसले, बोनी कपूर आणि रश्मी देसाई यांच्यासह इतर बॉलिवूड कलाकारांनीही एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी भेट देऊन बाप्पाचे दर्शन घेतले. दरम्यान, सलमान खानचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत खूप चांगले संबंध आहेत. यापूर्वी सलमानची बहीण अर्पिताने आपल्या घरी गणपतीची स्थापना केली होती. तेव्हा बॉलिवूड स्टार्सशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही अर्पिताच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी आले होते. त्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

सलमान खानच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, सलमान खान शेवटचा 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात दिसला होता. ज्यामध्ये त्याच्यासोबत पूजा हेगडे आणि शहनाज गिल या अभिनेत्री दिसल्या होत्या. शहनाज गिलचा हा डेब्यू चित्रपट होता. आता सलमान खान लवकरच कतरिना कैफसोबत 'टायगर 3' या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: मुसळधार पावसाने मुंबईची जीवनवाहिनी ठप्प, मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक बंद

Marathwada Rain : मराठवाड्यातील पाण्याची चिंता मिटली; प्रमुख ११ धरणाची शंभरीकडे वाटचाल

Kullu Cloudburst Video: कुल्लूमध्ये ढगफुटी; रस्ते खचले, घरं, दुकानं गेली वाहून

Ladki Bahin Yojana: महत्त्वाची बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय

Thama: खूनी प्रेम कहानी...; आयुष्मान खुराना आणि नवाजुद्दीन सिद्दीकीचा थरार, रश्मिका मंदानाचा ग्लॅमर, 'थामा'चा जबरदस्त टिझर प्रदर्शित

SCROLL FOR NEXT