Elvish Yadav New Car: माणसानं किती श्रीमंत असावं! आलिशान घर खरेदी केल्यानंतर महिन्याभरात एल्विश यादवने घेतली करोडोंची कार

Elvish Yadav New Vlog: एल्विश यादवने त्याच्या युट्युब चॅनेलवर त्याच्या नवीन कारची माहिती दिली आहे.
Elvish Yadav New Car
Elvish Yadav New CarInstagram @jio Cinema

Elvish Yadav Didn't Get His Prize Money:

युट्युबर एल्विश यादव 'बिग बॉस ओटीटी २' जिंकल्यापासून चर्चेत आहे. 'बिग बॉस'नंतर त्याच्या प्रसिद्धीमध्ये वाढ झाली आहे. एल्विश दिवसेंदिवस यशाची एक-एक पायरी चढत आहे.

काही दिवसांपूर्वी एल्विशने दुबईमध्ये एक आलिशान घर घेतले आहे. त्याच्या एका व्हिडीओमध्ये त्याने नवीन घराची झलक दाखवली होती. आता एल्विशने आलिशान गाडी देखील खरेदी केली आहे.

Elvish Yadav New Car
Prayag Raj Passes Away: अमिताभ बच्चन, रजनीकांत यांचे चित्रपट लिहिणारा लेखक हरपला; दिग्दर्शक आणि अभिनेते प्रयाग राज यांचे निधन

एल्विश यादवने त्याच्या युट्युब चॅनेलवर त्याच्या नवीन कारची माहिती दिली आहे. एल्विशने निळ्या रंगाची मर्सिडीज बेन्ज इ५३ AMG खरेदी केली आहे. मर्सिडीजच्या या बेस मॉडेलची किंमत १.३० कोटींपासून सुरू होते.

एल्विश त्याच्या व्हिडीओमध्ये त्याचे कार कलेक्शन देखील दाखवले आहे. एल्विश यादव अवघ्या २५ वर्षाचा आहे. एवढ्या कमी वयात तो आलिशान जीवन जगत आहे. यामुळे त्याचे चाहते त्याचे कौतुक करत असतात. (Latest Entertainment News)

एल्विश यादवने या महिन्याच्या सुरुवातीलाच दुबईमध्ये ड्यूप्लेक्स घर खरेदी केले होते. त्याचे हे घर पाहून त्याचे चाहते थक्क झाले होते. एल्विशच्या या घरात एक मोठी खोली आणि सुंदर बालकनी आहे.

शेहनाज गिलचा चॅट देशी वाईब्ज या शोमध्ये एल्विशने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. एल्विशने या शोमध्ये सांगितले की, 'बिग बॉस ओटीटीच्या निर्मात्यांनी अद्याप त्याला त्याची २५ लाखांची प्राईज मनी दिलेली नाही. हे याहून शेहनाज देखील चकित झाली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com