बॉलिवूड (Bollywood) अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor), बॉबी देओल (Bobby Deol), अनिल कपूर (Anil Kapoor) आणि रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) स्टारर ‘ॲनिमल’ चित्रपट (Animal Movie) ब्लॉकबस्टर ठरला. पण या चित्रपटावरून सुरू असलेला वाद काही संपलेला नाही. या चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिससह जगभरात 886 कोटींपेक्षा जास्त कमाई (Animal Box Office And Worldwide Collection) केली. इतकी बक्कळ कमाई केली असताना देखील अद्याप या चित्रपटाच्या हिंसक सीन्सवर अनेक जण नकारात्मक प्रतिक्रिया देत आहेत.
भारतीय चित्रपटसृष्टीचे प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी ‘ॲनिमल’ चित्रपटावर टीका करत या चित्रपटाचे यश धोकादायक असल्याचे मत व्यक्त केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता 'अॅनिमल'च्या सोशल मीडिया टीमने जावेद अख्तर यांचा खरपूस समाचार घेतला. जावेद अख्तर यांना प्रत्युत्तर म्हणून चित्रपटाच्या निर्मात्यांनी अख्तर यांना ट्विटरवर टॅग देखील केले आहे. निर्मात्यांनी जावेद अख्तरांच्या लेखनाच्या आकलनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
'अॅनिमल' चित्रपटाच्या टीमच्या वतीने एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये असे लिहण्यात आले आहे की, 'जर तुमच्या क्षमतेचा लेखक प्रियकराचा (झोया आणि रणविजय) विश्वासघात आणि फसवणूक समजू शकत नसेल, तर तुमची सर्व कला खोटी आहे. जेव्हा एखादा माणूस प्रेमात स्त्रीला फसवतो आणि जेव्हा ती एखाद्या पुरुषाला तिचे बूट चाटायला सांगते तेव्हा तुम्ही लोक त्याला स्त्रीवाद म्हणत आनंद साजरा करता. प्रेमाला लैंगिक राजकारणापासून मुक्त होऊ द्या. चला त्यांना फक्त प्रेमी म्हणूया. प्रियकर फसवणूक करतो आणि खोटे बोलतो. मग त्याला सांगितले जाते बूट चाट.'
जावेद अख्तर यांनी औरंगाबाद येथील अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात चित्रपटांच्या सध्य स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली होती. 'अॅनिमल' या चित्रपटाचे नाव घेत जावेद अख्तर म्हणाले होते की, 'माझा विश्वास आहे की आज तरुण चित्रपट निर्मात्यांसाठी त्यांना कोणत्या प्रकारची पात्रे तयार करायची आहेत ज्याचे समाज कौतुक करेल याची चाचणी घेण्याची ही वेळ आहे. उदाहरणार्थ जर एखादा चित्रपट असेल ज्यामध्ये एखाद्या पुरुषाने एखाद्या स्त्रीला त्याचे बूट चाटण्यास सांगितले किंवा एखाद्या पुरुषाने स्त्रीला झापड मारणे ठीक आहे असे म्हटले तर आणि जर चित्रपट सुपरहिट झाला तर ते खूपच धोकादायक आहे.'
दरम्यान, रणबीर कपूरने 'अॅनिमल' चित्रपटात तृप्ती डिमरीला आपले प्रेम सिद्ध करण्यासाठी बूट चाटण्यास सांगितले होते. त्याचवेळी शाहिद कपूरने 'कबीर सिंह' चित्रपटातील कियारा अडवाणीला झापड मारली होती. या दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शन संदीप वंगा रेड्डी यांनी केले होते आणि दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले होते. या दोन्ही चित्रपटांच्या यशाबद्दलच जावेद अख्तर यांनी चिंता व्यक्त केली होती.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.