Animal Trailer Saam Tv
मनोरंजन बातम्या

Animal Trailer Twitter Reaction: 'ॲनिमल'चा ट्रेलर पाहून प्रेक्षकांच्या अंगावर आला काटा, रणबीर कपूरच्या अभिनयाचे कौतुक

Animal Trailer Released: निर्मात्यांनी सांगितल्याप्रमाणे २३ नोब्हेंबरला 'ॲनिमल'चा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करत प्रेक्षकांना आनंदाचा धक्का दिला.

Priya More

Ranbir Kapoor Animal Movie:

बॉलिवूड (Bollywood) सुपरस्टार रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) बहुप्रतीक्षित 'ॲनिमल' चित्रपट (Animal Movie) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरची रणबीरचे चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर आज त्यांची प्रतीक्षा संपली. 'ॲनिमल'चा धमाकेदार ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.

निर्मात्यांनी सांगितल्याप्रमाणे २३ नोब्हेंबरला या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करत प्रेक्षकांना आनंदाचा धक्का दिला. या चित्रपटाच्या ट्रेलरने (Animal Trailer) सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'ॲनिमल' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच अवघ्या काही मिनिटांमध्येच त्याला प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळाली आहे. हा ट्रेलर पाहून प्रेक्षक चित्रपट रिलीज होण्याची वाट पाहत आहेत. या चित्रपटातील रणबीर कपूर, बॉबी देओल आणि रश्मिका मंदान्ना यांचा अभिनय सर्वांना प्रचंड आवडला. या ट्रेलरमधल रणबीर कपूरच्या लूकने प्रेक्षकांचे मन जिंकले. त्याचसोबत बॉबी देओलची स्टाईल चाहत्यांना प्रचंड आवडली. या चित्रपटातील दोघांचे लूक खूपच जबरदस्त आहे. ऐवढंच नाही तर अनिल कपूरच्या अभिनयाचे देखील चांगलेच कौतुक होत आहे.

रणबीर कपूर आणि बॉबी देओलचा 'अ‍ॅनिमल' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. चित्रपटातील ॲक्शन सीन्स प्रेक्षकांना खूप आवडत आहेत. काही जण बॉबी देओलच्या अभिनयाच्या प्रेमात पडले, तर काहींची मनं रणबीर कपूरच्या लूकने जिंकली. याशिवाय सोशल मीडियावर लोक अनिल कपूरबद्दल बोलताना दिसले. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर चाहत्यांनी रणबीर कपूरचा 'अॅनिमल' चित्रपटातील अभिनय अगदी परफेक्ट असल्याचे वर्णन केले आहे.

दरम्यान, अनिल कपूरने या चित्रपटामध्ये महत्त्वाची भूमिका साकारली असून बॉबी देओल खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित क्राईम ड्रामा आहे. हा बहुप्रतिक्षित चित्रपट १ डिसेंबर २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात पहिल्यांदाच रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्याचसोबत ही जोडी पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करत आहेत. हा चित्रपट पाहण्यासाठी चाहतेही खूप उत्सुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dangerous Diet Foods : डायटिंग करताय ? हे ३ पदार्थ तुमच्या जीवावर बेतू शकतात.

Maharashtra Live News Update : बोलताना भान ठेवा, अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंचे कान टोचले

बसने स्कूटीस्वार तरुणीला चिरडले; घटनास्थळीच मृत्यू; सीसीटीव्ही व्हिडिओ आला समोर

Maharashtra Politics : निवडणूका जिंका, महामंडळ मिळवा! चंद्रशेखर बावनखुळे नेमके काय म्हणाले ? | VIDEO

ITR Filling 2025: आयकर विभागाचा मोठा निर्णय! आयटीआर रद्द झाला तरीही पुन्हा मिळणार संधी, खात्यात जमा होणार रिफंड

SCROLL FOR NEXT