Chandu Champion New Poster Saam Tv
मनोरंजन बातम्या

Chandu Champion New Poster: कार्तिक आर्यनचा 'चंदू चॅम्पियन'मधील खरतनाक अंदाज, एका टेकमध्ये शूट केला युद्धाचा सीन

Kartik Aryan New Look From Chandu Champion: कार्तिक आर्यनचा 'चंदू चॅम्पियन' हा चित्रपट पुढच्या वर्षी १४ जून २०१४ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Priya More

Bollywood Actor Kartik Aryan:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aryan) नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. कियारा अडवाणीसोबत (Kiara Advani) 'सत्यप्रेम की कथा' यासारखा सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर कार्तिक आर्यन त्याच्या आगामी 'चंदू चॅम्पियन' (Chandu Champion) या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून कार्तिक आर्यनची चांगलीच चर्चा होत आहे. त्याचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या शूटिंगला देखील सुरूवात झाली आहे. या चित्रपटाचे नवीन पोस्टर समोर आले आहे.

कार्तिक आर्यनचा 'चंदू चॅम्पियन' हा चित्रपट पुढच्या वर्षी १४ जून २०१४ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'बजरंगी भाईजान'चे दिग्दर्शक कबीर खान या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. कार्तिक 'चंदू चॅम्पियन'शी संबंधित माहिती दररोज त्याच्या चाहत्यांसोबत शेअर करतो. कार्तिकने काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूक शेअर केला होता. आता कार्तिकने या चित्रपटाचे नवीन पोस्टर शेअर करत कबीर खानचे आभार मानले आहेत.

कार्तिक आर्यनने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत कबीर खानच्या चित्रपटाचा एक सीन शूट करणे त्याच्यासाठी किती आव्हानात्मक होते हे सांगितले. कार्तिकने इन्स्टा पोस्टमध्ये 'चंदू चॅम्पियन' चित्रपटातील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये कार्तिकने लष्करी अधिकाऱ्याचा गणवेश परिधान केलेला दिसत आहे. हातात रायफल घेऊन तो फायरिंग करताना दिसत आहे. कार्तिकच्या चेहऱ्यावर प्रचंड राग पाहायला मिळत आहे.

कार्तिकने हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, '८ मिनिटांच्या युद्धाच्या दृश्याचा हा एकच शॉट माझ्या अभिनयातील सर्वात आव्हानात्मक, नेत्रदीपक आणि कठीण पण सर्वात संस्मरणीय शॉट ठरला. मला आयुष्यभर लक्षात ठेवण्यासारखी स्मृती दिल्याबद्दल कबीर खानसरांचे आभार.'

कार्तिक आर्यनच्या या पोस्टला त्याच्या चाहत्यांनी खूप चांगली पसंती दिली आहे. ३ तासांमध्ये या पोस्टला साडेचार लाखांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. या पोस्टवर कमेंट करत कार्तिकच्या एका चाहत्याने लिहिले की, 'या चित्रपटाची वाट पाहू शकत नाही.' दुसऱ्या चाहत्याने लिहिले की, 'हा शॉट पाहण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही.' आणखी एका चाहत्याने लिहिले की, 'कार्तिक आर्यन एक जबरदस्त अभिनेता आहे.'

कार्तिक आर्यनच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, तो 'चंदू चॅम्पियन' या चित्रपटाव्यतिरिक्त 'आशिकी ३' आणि 'कॅप्टन इंडिया' या चित्रपटामध्येही दिसणार आहे. कार्तिकच्या 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत कियारा आडवाणी मुख्य भूमिकेत होती. हा चित्रपट जून २०२३ मध्ये रिलीज झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

SCROLL FOR NEXT