Kartik Aaryan New Car  Saam Tv
मनोरंजन बातम्या

आमची रेंज थोडीशी वाढली..., Kartik Aaryan ने खरेदी केली ६ कोटींची आलिशान कार; कटोरीसोबत शेअर केला फोटो

Kartik Aaryan Car Collection: कार्तिक आर्यनने आपल्या कार कलेक्शनमध्ये आणखी एका महागड्या कारचा समावेश केला आहे. नव्या कारला घरी घेऊन जातानाचे कार्तिक आर्यनचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Priya More

Kartik Aaryan Buy New Car:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) सध्या त्याचा आगामी चित्रपट 'भूल भुलैया 3'मुळे (Bhool Bhulaiyaa 3) चर्चेत आहे. कार्तिकच्या या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. कार्तिकच्या हातामध्ये 'आशिकी 3' चित्रपट देखील आहे. सध्या तो या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. कार्तिकच्या हातामध्ये एकापेक्षा एक चांगले चित्रपट येत आहेत. अशामध्ये या यशादरम्यान कार्तिक आर्यनने नवीन आलिशान कार खरेदी केली आहे. कार्तिक आर्यनने आपल्या कार कलेक्शनमध्ये आणखी एका महागड्या कारचा समावेश केला आहे. नव्या कारला घरी घेऊन जातानाचे कार्तिक आर्यनचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

कार्तिक आर्यनला आलिशान आणि महागड्या कार प्रचंड आवडतात. अशामध्ये त्याने आपली ड्रीम कार खरेदी केली आहे. कार्तिक आर्यनने एखादी छोटी-मोठी कार खरेदी केली नाही तर तब्बल ६ कोटी रुपयांची आलिशान कार खरेदी केली आहे. कार्तिकने एसयूव्ही (SUV) कार खरेदी केली आहे. त्यांच्या या नव्या कारसोबतचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहते आणि सेलिब्रिटी त्याला शुभेच्छा देत आहेत.

कार्तिक आर्यनच्या नवीन एसयूव्ही कार 'रेंज रोव्हर'चे काही व्हिडिओ समोर आले आहेत. यामध्ये कार्तिक त्याच्या नवीन कारसमोर नारळ फोडताना दिसत आहे. कार्तिकची आई देखील कारची पूजा करताना दिसत आहे. स्वत: कार्तिकने ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली. कार्तिकने शेअर केलेल्या फोटोमध्ये तो काटोरीसोबत त्याच्या नवीन कारच्या ट्रंकमध्ये झोपलेला दिसत आहे. कार्तिक आणि कटोरीचा हा फोटो खूपच क्युट आहे. त्याचा हा फोटो व्हायरल होत आहे.

कार्तिक आर्यनने नव्या कारसोबतचा फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले की,'आमची रेंज थोडी वाढली आहे.' या पोस्टवर कमेंट्स करत अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. कार्तिक आर्यनच्या या रेंज रोवरचा रंग बॉटल ग्रीन आहे. या कारची किंमत 4.94 कोटी ते 6 कोटी रुपयांदरम्यान आहे. या कारसोबत कार्तिक आर्यनच्या लग्झरी कार कलेक्शनमध्ये या चौथ्या कारचा समावेश झाला आहे. कार्तिक आर्यनकडे रेंज रोव्हर व्यतिरिक्त Lamborghini, McLaren आणि Porsche सारख्या महागड्या कार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: कोकणात ठाकरे गटाला भलं मोठं खिंडार; विश्वासू समर्थकांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

Ganesh Visarjan 2025 : माझ्या बाप्पाला घेऊन जाऊ नका; निरोप देताना चिमुकलीला अश्रू अनावर, VIDEO

Maharashtra Politics : एवढा पैसा कुठून आला काका? मंत्री सरनाईकांच्या टेस्ला कार खरेदीवर मराठी अभिनेत्याचा सवाल

Anant Chaturdashi 2025 live updates : गणपती विसर्जन मिरवणुकीत मंत्री गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांसोबत ठेका धरला

Ganesh Visarjan 2025: आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच 'गणेश' गिरणा पात्रात बुडाला, गणेश विसर्जनावेळी राज्यभरातील ५ ठिकाणी विपरित घडलं, १० जण बुडाले

SCROLL FOR NEXT