Mast Mein Rahne Ka Trailer Saam Tv
मनोरंजन बातम्या

Mast Mein Rahne Ka Trailer: जॅकी श्रॉफ आणि नीना गुप्ताचा 'मस्त में रहने का'चा ट्रेलर आऊट, राखी सावंतच्या लूकने वेधलं लक्ष

Mast Mein Rehne Ka Movie: 'मस्त में रहने का'चा ट्रेलर रिलीज झाला. प्रेक्षकांना हसायला लावणारा असा हा ट्रेलर आहे. हा चित्रपट खरंच प्रेक्षकांना मस्तमध्ये कसं जीवन जगायचे हा संदेश देणार आहे.

Priya More

Jackie Shroff And Neena Gupta Movie:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) आणि अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) सध्या त्यांच्या आगामी 'मस्त में रहने का' (Mast Mein Rahne Ka) चित्रपटामुळे चर्चेत आहेत. हा एक कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. 'मस्त में रहने का' प्रेक्षकांना भावनिकरित्या गुंतवून ठेवेल आणि त्यांना जीवन जगण्याचा खरा अर्थ विचार करण्यास प्रोत्साहित करेल असा चित्रपट आहे. नुकताच 'मस्त में रहने का'चा ट्रेलर रिलीज झाला. प्रेक्षकांना हसायला लावणारा असा हा ट्रेलर आहे. हा चित्रपट खरंच प्रेक्षकांना मस्तमध्ये कसं जीवन जगायचे हा संदेश देणार आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जॅकी श्रॉफ आणि नीना गुप्ता यांच्यातील सुंदर केमिस्ट्री ट्रेलरमध्ये दाखवण्यात आली आहे. ते वयाने तसेच सामाजिक बंधनांनी बांधलेले आहेत. त्यांचे जीवन पूर्णपणे विरुद्ध आहे. यानंतर काही घटनांनंतर ते एकमेकांना भेटतात. दोघांमध्ये कधी भांडणं तर कधी धमाल दाखवण्यात आली आहे. दोघंही आपलं आयुष्य जगण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधत आहेत. दोघांचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन देखील वेगळा असल्याचे दाखवण्यात आले आहे.

जॅकी श्रॉफ यांनी या चित्रपटाविषयी सांगितले की, 'एक अभिनेता म्हणून मी नेहमीच अशा भूमिकांचा शोध घेत आलो आहे. ज्यामुळे मला कलाकार म्हणून माझ्या क्षमतेची चाचणी घेता येईल. भूमिका ज्या अर्थपूर्ण आणि वेगळ्या आहेत. जेव्हा मी 'मस्त में रहने का' ची स्क्रिप्ट वाचली तेव्हा ही कथा किती अनोखी आहे हे पाहून मी प्रभावित झालो.' तर, नीना गुप्ता यांनी सांगितले की, 'स्त्रीची इतकी सुंदर रचलेली भूमिका साकारताना मला आनंद झाला आहे.'

'मस्त में रहने का' या चित्रपटाचे दिग्दर्शन विजय मौर्य यांनी केले आहे. पायल अरोरा आणि विजय मौर्य यांनी मिळून त्याची पटकथा लिहिली आहे. या चित्रपटात अभिषेक चौहान, मोनिका पनवार, राखी सावंत आणि फैसल मलिक हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट ८ डिसेंबर रोजी OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video वर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहून प्रेक्षक चित्रपटाच्या रिलीज होण्याची वाट पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eye Care: डोळ्यांसाठी सर्वात महत्वाचे आहेत 'हे' व्हिटामिन, ९९% लोकांना माहिती नसेल

बाबोsss ! २० हजाराला कोथिंबीर जुडी, ४१ हजाराला एक नारळ, पाहा VIDEO

Gautami Patil New Song: सबसे कातील गौतमी पाटीलचं “राणी एक नंबर” गाणं प्रदर्शित

Jio-Airtel Recharge Plans: वाह क्या बात! डेटा रिचार्जचे सहा भन्नाट प्लॅन्स; फक्त ५ रुपयांत मिळेल इंटरनेट डेटा

मनोज जरांगे पाटील चौथी पास झालेत का? गुणरत्न सदावर्तेंचा रॅपमधून हल्लाबोल, VIDEO

SCROLL FOR NEXT