Hrithik Roshan And Sussanne Khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Hrithik Roshan Video: 'तुम्ही वेगळे का झालात?', हृतिकने एक्स वाइफला मारली मिठी, VIDEO पाहून नेटकऱ्याने केला सवाल

Hrithik Roshan And Sussanne Khan: 'फाइटर' चित्रपटाचा ट्रेलर १५ जानेवारीला म्हणजे आज रिलीज झाला. अशामध्येच हृतिक रोशनचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तो त्याची एक्स वाइफ सुजैन खानला मिठी मारताना दिसत आहे.

Priya More

Hrithik Roshan And Sussanne Khan Video:

बॉलिवूड (Bollywood) सुपरस्टार हृतिक रोशन (Hrithik Roshan) सध्या त्याच्या आगामी 'फाइटर' चित्रपटामुळे (Fighter Movie) चांगलाच चर्चेत आहे. हृतिकचा हा चित्रपट येत्या 25 जानेवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टीझर आणि गाण्यांनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. आता सर्वजण या चित्रपटाच्या ट्रेलरची वाट पाहत आहेत.

'फाइटर' चित्रपटाचा ट्रेलर १५ जानेवारीला म्हणजे आज रिलीज झाला. अशामध्येच हृतिक रोशनचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तो त्याची एक्स वाइफ सुजैन खानला मिठी मारताना दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत..

सेलिब्रिटी फोटोग्राफर मानव मंगलानी यांनी त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर हृतिक आणि सुजैनचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, हृतिक रोशन एका प्रदर्शनामध्ये पोहोचला आहे आणि त्याची एक्स वाइफ सुजैन खान त्याठिकाणी आधीच उपस्थित आहे. प्रदर्शनात पोहोचताच हृतिक रोशनने सुजैन खानला मिठी मारली आणि दोघेही एकमेकांना खूप प्रेमाने भेटतात. यासोबतच सुजैन खानने हृतिकसोबत फोटोही क्लिक केला आहे.

हृतिक रोशन आणि सुजैन खानचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यावर नेटकरी कमेंट करत आहेत. या व्हिडीओवर कमेंट्स करत एका यूजरने लिहिले की, 'हे दोघे एकत्र चांगले दिसतात.' दुसऱ्या यूजरने लिहिले की, 'यांची जोडी छान दिसत आहे.' तिसऱ्या युजरने लिहिले की, 'ते वेगळे का झाले?' तर आणखी एका यूजरने लिहिले की, 'भेटण्याची पद्धत थोडी वेगळी आहे.'

दरम्यान, सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित 'फाइटर' चित्रपटात हृतिक रोशन मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहेत. हृतिक रोशनसोबत दीपिका पदुकोण, अनिल कपूर, करण सिंग ग्रोव्हर आणि अक्षय ओबेरॉय देखील या चित्रपटात मुख्य भूमिकेत असणार आहेत. 'फायटर' हा भारतातील पहिला एरियल 'अॅक्शन' चित्रपट आहे. यापूर्वी आकाशात चित्रित केलेल्या दृश्यांसाठी व्हीएफएक्सचा वापर करण्यात आला आहे. 'फायटर' चित्रपटात ही दृश्ये खरी असणार आहे. त्यामुळे या चित्रपटाबाबत प्रेक्षकांच्या मनामध्ये कमालीची उत्सुकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : अलका टॉकीज चौकात "श्रीमंत" दाखल

Ganesh visarjan 2025 : गणपतीचे विसर्जन करताना विपरीत घडलं, तीन तरुण पाण्यात वाहून गेले

Pune News: पुण्यात दगडूशेठ गणपतीची महाआरती पाहा VIDEO

ITR Filing : टॅक्स रिफंड परताव्याचा फॉर्म अडकून पडलाय? मग 'या' गोष्टी एकदा तपासाच

Akola Accident: गणेश विसर्जन करून परताना भक्तांवर काळाचा घाला; तरुणाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT