बॉलिवूड सुपरस्टार हृतिक रोशन (Hrithik Roshan) त्याच्या बहुप्रतिक्षित 'फायटर' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात हृतिक रोशनसोबत दीपिका पदुकोण, अनिल कपूर, करण सिंग ग्रोव्हर आणि अक्षय ओबेरॉय देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 25 जानेवारीला म्हणजे प्रजासत्ताक दिनानिमित्त हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या चित्रपटातील पोस्टर, टीझर आणि गाण्यांना प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती मिळाली. प्रेक्षक आता या चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर त्यांची प्रतीक्षा आज संपली. मकर संक्रांतीच्यानिमित्ताने निर्मात्यांनी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. या चित्रपटाच्या धमाकेदार ट्रेलरला प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती मिळत आहे.
ट्रेलरमध्ये, हृतिक रोशन, दीपिका पदुकोण, अनिल कपूर आणि करण सिंग ग्रोव्हर हवाई दलातील अधिकारी देशभक्तीच्या भावनेत बुडलेले दिसत आहेत. या चित्रपटाच्या ३ मिनिटं २३ सेकंदाच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती मिळत आहे. २५ जानेवारीला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणाऱ्या 'फायटर' चित्रपटाचा ट्रेलर पाहून चाहते वेडे झाले आहेत.
'फाइटर' चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणचा प्रत्येक एरियल अॅक्शन सीन लोकांना आनंद देत आहे. हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण यांच्या 'फाइटर' चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षकांची चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे. ते हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये पाहण्यासाठी खूप उत्सुक झाले आहेत. त्यासाठी प्रेक्षकांना 25 जानेवारीची वाट पाहावी लागणार आहे.
हृतिक रोशनने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर या चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. इन्स्टावर ट्रेलर शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये, 'हर उड़ान वतन के नाम!', असे लिहिले आहे. हृतिकच्या य पोस्टला १ कोटींपेक्षा जास्त व्हयूज मिळाले आहेत.
दरम्यान, सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित 'फाइटर' चित्रपटात हृतिक रोशन मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहेत. हृतिक रोशनसोबत दीपिका पदुकोण, अनिल कपूर, करण सिंग ग्रोव्हर आणि अक्षय ओबेरॉय देखील या चित्रपटात मुख्य भूमिकेत असणार आहेत. 'फायटर' हा भारतातील पहिला एरियल 'अॅक्शन' चित्रपट आहे. यापूर्वी आकाशात चित्रित केलेल्या दृश्यांसाठी व्हीएफएक्सचा वापर करण्यात आला आहे. 'फायटर' चित्रपटात ही दृश्ये खरी असणार आहे. त्यामुळे या चित्रपटाबाबत प्रेक्षकांच्या मनामध्ये कमालीची उत्सुकता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.