Anil Kapoor Fitness Saam Tv
मनोरंजन बातम्या

Anil Kapoor Fitness: 'फायटर'साठी अनिल कपूरने घेतली बरीच मेहनत, तब्बल इतके किलो वजन केलं कमी

Anil Kapoor Weight Loss: फायटर चित्रपटामुळे अनिल कपूर चांगलेच चर्चेत आहे. या चित्रपटासाठी अनिल कपूर यांनी खूप मेहनत घेतली आहे. त्यांनी तब्बल १५ किलो वजन कमी केले आहे.

Priya More

Fighter Movie:

‘ॲनिमल’ चित्रपटाच्या दमदार यशानंतर बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाले आहेत. बॉलिवूडचा (Bollywood) सुपरस्टार हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) यांच्या 'फायटर' चित्रपटामध्ये अनिल कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. फायटर चित्रपटामुळे अनिल कपूर चांगलेच चर्चेत आहे. या चित्रपटासाठी अनिल कपूर यांनी खूप मेहनत घेतली आहे. त्यांनी तब्बल १५ किलो वजन कमी केले आहे.

या चित्रपटामध्ये अनिल कपूर यांनी ४५ वर्षांच्या व्यक्तीची भूमिका साकारली असून या व्यक्तिरेखेसाठी त्यांनी खूप मेहनत घेतली आहे. अनिल कपूर प्रत्येक चित्रपटात आपल्या व्यक्तिरेखेप्रमाणे दिसण्यासाठी खूप मेहनत घेतात. त्यांनी 'फायटर'साठीही तेच केले. या भूमिकेमध्ये परफेक्ट बसण्यासाठी अनिल कपूर यांनी वजन कमी केले. 'फाइटर'मधील त्याच्या व्यक्तिरेखेसाठी अनिल कपूर यांनी खूप वजन कमी केले.

अनिल कपूर यांनी या चित्रपटातील भूमिकेसाठी 15 किलो वजन कमी केले आहे. या चित्रपटामध्ये अनिल कपूर हे वायुसेना अधिकारी राकेश जयसिंग उर्फ ​​रॉकीच्या भूमिकेत दिसणार आहे. या व्यक्तीरेखेसाठी त्यांनी खूप मेहनत घेतली आहे. 'फाइटर'मध्ये हृतिक रोशन, अनिल कपूर, दीपिका पदुकोण आणि करण सिंग ग्रोव्हर, अक्षय ओबेरॉय, संजीदा शेख, तलत अझीझ हे उत्कृष्ट स्टारकास्ट महत्वाच्या भूमिकेत आहेत. विशाल-शेखर जोडीने या चित्रपटासाठी गाणी गायली आहेत. हा चित्रपट 25 जानेवारी 2024 रोजी रिलीज होणार आहे.

दरम्यान, अनिल कपूर हे संदीप रेड्डी वंगा यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'अ‍ॅनिमल' चित्रपटामध्ये महत्वाच्या भूमिकेत होते. हा चित्रपट मागच्या वर्षी प्रदर्शित झाला असून सुपरहिट ठरला. या चित्रपटाने फक्त बॉक्स ऑफिसच नाही तर जगभरामध्ये जबरदस्त कमाई केली. या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. प्रेक्षकांना रणबीरचा अभिनयही खूप आवडला. या चित्रपटाने एका महिन्यातच बॉक्स ऑफिससह जगभरात 886 कोटींपेक्षा जास्त कमाई (Animal Box Office And Worldwide Collection) केली. आता अनिल कपूर यांच्या आगामी 'फायटर' चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Sri Lanka : टीम इंडियाची सुपर ओव्हरमध्ये झुंजार खेळी, श्रीलंकेच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

SCROLL FOR NEXT