Mission Raniganj  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Mission Raniganj Online Leak: बॉलिवूडच्या 'खिलाडी'ला मोठा झटका, रिलीजच्या पहिल्या दिवशीच 'मिशन रानीगंज' ऑनलाईन लीक

Priya More

Mission Raniganj:

बॉलिवूडचा (Bollywood) 'खिलाडी' अर्थात अभिनेता अक्षय कुमारचा (Actor Akshay Kumar) बहुप्रतिक्षित'मिशन रानीगंज' चित्रपट आजच प्रेक्षकांच्या भेटीला आला. अक्षय कुमारचे चाहते त्याच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर आज त्यांची ही प्रतीक्षा संपली. या चित्रपटाला रिलीजच्या पहिल्याच दिवशी प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहेत.

अक्षय कुमारच्या अभिनयाचे कौतुक केले जात आहे. अशामध्ये अक्षय कुमार आणि या चित्रपटाच्या निर्मात्यांना मोठा धक्का बसला आहे. कारण 'मिशन रानीगंज' हा चित्रपट रिलीजच्या पहिल्याच दिवशी ऑनलाइन लीक झाला आहे. यामुळे चित्रपटाच्या कलेक्शनवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

अक्षय कुमार आणि परिणीती चोप्राचा 'मिशन रानीगंज' हा चित्रपट ६ ऑक्टोबरला म्हणजे आज थिएटरमध्ये रिलीज झाला. रिलीजच्याच दिवशी तो ऑनलाइन लीक झाला . मीडिया रिपोर्ट्समध्ये असे सांगितले जात आहे की 'मिशन रानीगंज' हा चित्रपट MovieRulz, FilmyZilla, TamilRockers यासह अनेक पायरेटेड वेबसाइटवर लीक झाला आहे. या वेबसाईटवरून हा चित्रपट एचडी प्रिंटमध्ये फ्रीमध्ये डाउनलोड करता येत आहे.

अक्षय कुमारच्या 'मिशन रानीगंज' या चित्रपटापूर्वी या पायरेटेड साइट्सवर 'चंद्रमुखी 2', 'फुकरे 3', 'द वॅक्सीन वॉर'सह अनेक चित्रपट लीक झाले आहेत. पायरेटेड साइट्सवर चित्रपट लीक झाल्यामुळे बॉक्स ऑफिस कलेक्शनवर परिणाम होतो. आता 'मिशन रानीगंज' चित्रपट लीक झाल्यामुळे चित्रपटाच्या कलेक्शनवर किती परिणाम होईल हे येत्या काही दिवसांमध्येच कळेल.

दरम्यान, अक्षय कुमारचा 'मिशन रानीगंज' हा चित्रपट दिवंगत जसवंत सिंग गिल यांच्या जीवनावर आधारित आहे. १९८९ मध्ये जसवंत सिंग गिल यांनी शौर्य दाखवत पश्चिम बंगालमधील कोळसा खाणीत पुराच्या पाण्यामुळे अडकलेल्या ६५ मजुरांना वाचवले होते. जसवंत सिंग गिल यांचे २०१९ मध्ये निधन झाले.

अक्षय कुमारच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, 'मिशन रानीगंज' या चित्रपटाव्यतिरिक्त तो 'बडे मियाँ छोटे मियाँ', 'वेलकम ३', 'हेरा फेरी ३', 'स्काय फोर्स', 'हाऊसफुल ५' यासारख्या चित्रपटांमध्ये काम करत आहे. अक्षय कुमार 'सोरारई पोटरु' हिंदी रिमेकमध्ये काम करताना दिसणार आहे. तो शेवटचा 'OMG 2' चित्रपटात दिसला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT