Akshay Kumar  Saam TV
मनोरंजन बातम्या

Akshay Kumar: ट्विंकल खन्ना भेटण्याआधी 'खिलाडी कुमार'चं अनेक वेळा तुटलंय हृदय, स्वत:ला असं सावरलं...

Akshay Kumar Married Life: अक्षय कुमार सध्या त्याचा आगामी चित्रपट 'बडे मियाँ और छोटे मियाँ'च्या प्रमोशनमध्ये खूपच व्यस्त आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अक्षय कुमारने टायगर श्रॉफसोबत रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्ट शोमध्ये हजेरी लावली.

Priya More

Akshay Kumar On Breakup :

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) हे बॉलिवूडमधील सर्वांचे आवडते कपल आहे. या दोघांच्या लग्नाला 23 वर्षे पूर्ण झाली असून त्यांना आरव आणि नितारा ही दोन मुलंही आहेत. अक्षय कुमार सध्या त्याचा आगामी चित्रपट 'बडे मियाँ और छोटे मियाँ'च्या प्रमोशनमध्ये खूपच व्यस्त आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अक्षय कुमारने टायगर श्रॉफसोबत रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्ट शोमध्ये हजेरी लावली. अक्षय कुमार यावेळी त्याचे वैवाहिक जीवन आणि लग्नापूर्वीच्या ब्रेकअपवर खुलेपणाने बोलला.

'द रणवीर शो पॉडकास्ट'च्या एपिसोडमध्ये अक्षय कुमारने लग्नाआधी 'दोन-तीन' ब्रेकअप्स झाले होते त्यावेळी त्याने कशी परिस्थिती हाताळली याबद्दल सांगितले. यावेळी रणवीरने अक्षयला विचारले की ब्रेकअप झालेल्या आजच्या तरुणांना काय सल्ला देशील. यावर उत्तर देताना अक्षय म्हणाला की, 'माझ्यासोबत असे २-३ वेळा घडले आहे. जेव्हाही माझे ब्रेकअप झाले. मी ते channelize करण्याचा अधिक सराव करायचो कारण खूप राग आलेला असतो. त्यामुळे तुम्हाला ते channelize करणे आवश्यक असते.'

ट्विंकलसोबत लग्न करण्यापूर्वी अक्षय कुमारचे नाव रवीना टंडन, शिल्पा शेट्टी आणि पूजा बत्रा या अभिनेत्रींसोबत जोडले गेले होते. अक्षय पुढे म्हणाला, 'मी त्यावेळी जास्त वर्कआउट करयचो. जेवण जास्त करायचो. माझा विश्वास आहे की, एक मार्शल आर्टिस्ट ब्रेकअपचा सामना कसा करतो. हा एकमेव पर्याय आहे ज्याला आपण मन तुटणे असे समजतो.' रवीना आणि अक्षय यांनी 1995 मध्ये डेटींगला सुरुवात केली आणि 90 च्या दशकाच्या शेवटी साखरपुडा केला. पण नंतर ते वेगळे झाले. यानंतर अक्षयने 2001 मध्ये ट्विंकलशी लग्न केले. तर रवीनाने 2004 मध्ये फिल्म निर्माता-व्यावसायिक अनिल थडानीशी लग्न केले.

रवीना टंडनने अक्षयसोबत साखरपुडा तुटल्यानंतर 2023 मध्ये एएनआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले होते की, 'मोहरा दरम्यान आम्ही एक हिट कपल होतो आणि आताही जेव्हा आम्ही सार्वजनिकपणे एकमेकांना भिडतो तेव्हा आम्ही सर्वजण एकत्र येतो. आम्ही प्रत्येक जण गप्पा मारतो. प्रत्येक जण पुढे जातो. कॉलेजमधल्या मुली दर आठवड्याला बॉयफ्रेंड बदलत असतात. पण एक एंगेजमेंट तुटली होती ती अजूनही माझ्या मनात अडकलेली आहे. मला कळत नाही का? प्रत्येकजण पुढे जातो. लोकांचे घटस्फोट होतात, ते पुढे जातात. त्यात काय मोठी गोष्ट आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

SCROLL FOR NEXT