Ahan Shetty Breakup With Tania Shroff Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ahan Shetty Breakup: ११ वर्षांचं रिलेशन तुटलं, अहान शेट्टीचं गर्लफ्रेंड तानिया श्रॉफसोबत ब्रेकअप

Ahan Shetty Breakup With Girlfriend Tania Shroff: अहान आणि तानिया सोशल मीडियावर सक्रीय असायचे. ते नेहमीच रोमँटिक फोटो शेअर करत एकमेकांप्रती प्रेम व्यक्त करायचे. पण आता दोघेही वेगळे झाले असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.

Priya More

Ahan Shetty:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता अहान शेट्टीच्या (Ahan Shetty) चाहत्यांना धक्का देणारी बातमी समोर आली आहे. अहान शेट्टी त्यांच्या लव्ह लाइफमुळे सध्या चर्चेत आला आहे. सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टीचे ११ वर्षांचं नातं तुटलं आहे. अहान शेट्टीचं त्याची लाँग टाइम गर्लफ्रेंड आणि मॉडेल तानिया श्रॉफसोबत ब्रेकअप झाला आहे. अहान आणि तानिया सोशल मीडियावर सक्रीय असायचे. ते नेहमीच रोमँटिक फोटो शेअर करत एकमेकांप्रती प्रेम व्यक्त करायचे. पण आता दोघेही वेगळे झाले असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. त्यामुळे अहानच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

सध्या सोशल मीडियावर अहान शेट्टी आणि तानिया श्रॉफचे ब्रेकअप झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, अहान आणि तानिया दीड महिन्यापूर्वीच वेगळे झाले होते. दोघेही सध्या सिंगल असून पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. दोघांचे ब्रेकअप का झाले? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसंच, तानिया आणि अहान या दोघांनीही ब्रेकअपबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.

तानिया श्रॉफ ही जयदेव आणि रोमिला यांची मुलगी आहे. तानिया मॉडेलसोबतच डिझायनर देखील आहे. अहान आणि तानिया लहानपणापासून खूप चांगले फ्रेंड्स आहेत. ११ वर्षांपासून ते एकमेकांना डेट करत होते. पण गेल्या काही दिवसांपासून ते एकत्र दिसत नाहीयेत. दोघेही रोज एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत होते. ज्याला चाहत्यांकडून खूप चांगली पसंती मिळत होती. पण काही दिवसांपासून ते एकमेकांसोबतचे फोटो शेअर करताना दिसत नाहीत.

२०२१ मध्ये अहान शेट्टीच्या 'तडप' चित्रपटाच्या स्क्रिनिंगवेळी तानिया शेट्टी कुटुंबासोबत दिसली होती. काही दिवसांपूर्वी अहान शेट्टी तिची बहीण अथिया शेट्टी आणि मित्रांसोबत पार्टी करताना दिसला होता. मात्र, नेहमी सोबत असणारी त्याची गर्लफ्रेंड तानिया त्याच्यासोबत दिसली नव्हती. तेव्हापासून दोघे वेगळे झाल्याच्या चर्चा सुरू होत्या. दरम्यान, अहान शेट्टीने 'तडप' चित्रपटतून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. अहानसोबत तारा सुतारिया मुख्य भूमिकेत होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: 'महिलेला भूतबाधा झाली' सासरच्यांना बाहेर बसवलं, मांत्रिकांकडून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

Apoorva Nemalekar : “प्रवास सोपा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT