बॉलीवूडचा (Bollywood) 'मिस्टर परफेक्शनिस्ट' म्हणजेच अभिनेता आमिर खान (Aamir Khan) बरेच दिवसस झाले कोणत्या चित्रपटात दिसला नाही. आमिर खानचे चाहते त्यांच्या नवनवीन विषयांवर आधारित चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतात. त्याच्या चाहत्यांची ही प्रतीक्षा आता संपली आहे. कारण आमिर खानने नुकताच त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. 'सितारे जमीन पर' (Sitaare Zameen Par) असं या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाचे आमिर खानचा सुपरहिट चित्रपट 'तारे जमीन पर'सोबत खास कनेक्शन आहे.
आमिर खानने नुकताच न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत या चित्रपटाविषयीची माहिती शेअर केली. तो म्हणाला, 'मी आजपर्यंत याबद्दल जाहीरपणे काहीही बोललो नाही आणि आताही जास्त काही सांगू शकणार नाही पण या चित्रपटाचे शीर्षक सांगू. या चित्रपटाचे शीर्षक 'सितारे जमीन पर' असे असेल. तुम्हाला माझा 'तारे जमीन पर' हा चित्रपट आठवत असेल. आता त्याचे नाव 'सितारे जमीन पर' असेल कारण आता तुम्ही त्याच थीमवर दहा पाऊलं पुढे जात आहात. तारे जमीन पर हा एक इमोशनल चित्रपट होता. आता हा चित्रपट हसवणारा असणार आहे.
'सितारे जमीन पर' हा चित्रपट तुम्हाला रडवण्याबरोबरच हसवेल आणि मनोरंजन सुद्धा करेल. म्हणूनच आम्ही खूप विचारपूर्वक हे नाव ठेवले आहे. आपल्या सर्वांमध्ये काही उणिवा आहेत आणि आपण ही थीम पुढे नेताना दिसतील. याआधीच्या चित्रपटात स्पेशल चाइल्ड इशान अवस्थीची कथा होती. तर यावेळी ९ मुलांची कथा आहे. ज्यांना स्वतःच्या समस्या आहेत. या चित्रपटात आमिर खान क्रीडा प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. आमिर खानचा हा चित्रपट २०२४ म्हणजेच पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, आमिर खान २०२२ मध्ये 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटात शेवटी दिसला होता. ज्यामध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री करीना कपूर मुख्य भूमिकेत होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. त्यामुळे आमिरला मोठा धक्का बसला. त्यानंतर त्याने काही काळ अभिनयातून ब्रेक घेतला आणि कोणताही प्रोजेक्ट साइन केला नाही. काही दिवसांपूर्वी आमिरने सनी देओलच्या 'लाहोर १९४७' या चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटाची चर्चा सुरू असताना आता त्याने 'सितारे जमीन पर' या आणखी एका चित्रपटाची घोषणा केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.