Welcome 3 Film Release Date and Title Announcement Saam Tv
मनोरंजन बातम्या

Welcome 3 Movie: ‘OMG 2’नंतर अक्षयच्या आगामी चित्रपटाची घोषणा, ‘वेलकम ३’च्या निर्मात्यांनी प्रदर्शनाची ही तारीख केली जाहीर

Chetan Bodke

Welcome 3 Film Release Date and Title Announcement

सध्या अनेक बॉलिवूड चित्रपटांची प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरू आहे. ‘वेलकम ३’ची घोषणा झाल्यापासून अनेकदा सोशल मीडियावर चर्चा झाली आहे. चित्रपटात अक्षय कुमार, संजय दत्त अर्शद वारसी आणि सुनील शेट्टी या तगड्या कलाकारांची फौज चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार असल्याची चर्चा होत आहे. नुकताच चित्रपटाविषयी नवीन अपडेट समोर आली आहे. नुकतंच निर्मात्यांनी चित्रपटाची घोषणा केली असून प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली.

वेलकमला भरघोस प्रतिसाद मिळाल्यानंतर दुसऱ्या भागाने मात्र प्रेक्षकांची निराशा केली होती. ‘वेलकम’च्या दुसऱ्या भागात जॉन अब्राहम आणि श्रृती हसनने प्रमुख भूमिका केली होती. नुकतंच निर्मात्यांनी ‘वेलकम ३’ची घोषणा केली आहे. नुकतीच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे.

येत्या २०२४ मध्ये नाताळच्या मुहूर्तावर हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ‘वेलकम ३’मध्ये संजय दत्त अर्शद वारसी आणि सुनील शेट्टी देखील प्रमुख भूमिका साकारणार असल्याची चर्चा होत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून ‘वेलकम ३’ची चर्चा सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटात अक्षयची भूमिका एका वेगळ्याच धाटणीची असण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘वेलकम ३’चे प्री-प्रॉडक्शन काम सुरू आहे. सोबतच प्रॉडक्शन टीमने या चित्रपटाचे शूटिंग लोकेशनही फायनल केले असून लवकरच शूटिंग सुरू होणार आहे. चित्रपटाची टीम सध्या ॲक्शन सीन आणि कॅरेक्टरच्या लूकवर काम करत असल्याची देखील माहिती मिळत आहे.

चित्रपटाचे नाव ‘वेलकम ३’ किंवा ‘वेलकम टू द जंगल’ असे असण्याची शक्यता आहे. ‘वेलकम’च्या दोन्हीही सिक्वेलचे दिग्दर्शन अनीस बज्मी यांनी केले आहे. पण ‘वेलकम ३’चे दिग्दर्शन अहमद खान करणार आहेत. आणि निर्मिती साजिद नाडियावाला करणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मंगळ ग्रहाला का म्हटलं जातं रेड प्लॅनेट?

Assembly Election: विधानसभेच्या मैदानात 'तुतारी'चाच आवाज! उमेदवारीसाठी तब्बल १६०० अर्ज; शरद पवारांकडून मुलाखतींचा धडाका

Baby Names Inspired by Flowers : सुगंधी आणि नाजूक फुलांवरून मुलींच्या नावाची यादी

Uddhav Thackeray: तुमच्या डोळ्यावरचं झापड पुसलं गेलं, शिंदे गटातून कार्यकर्ते परतले; ठाकरे काय म्हणाले?

Accident : कार- टेम्पोचा भीषण अपघात; चार जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT