Bollywood Movie Ulajh Trailer Out Saam TV
मनोरंजन बातम्या

Ulajh Movie Trailer: जान्हवी कपूर दिसणार आणखी एका आव्हानात्मक भूमिकेत, सस्पेन्स आणि थ्रिलर असणाऱ्या 'उलझ'चा ट्रेलर रिलीज

Janhvi Kapoor Starrer Ulajh Movie Trailer Out: हटके कथानक असलेल्या ह्या चित्रपटामध्ये जान्हवी कपूर एका आव्हानात्मक भूमिकेत दिसणार आहे. जान्हवीने IFS ऑफिसर सुहाना भाटियाचं पात्र साकारले आहे.

Chetan Bodke

अनंत- राधिकाच्या लग्नामुळे अभिनेत्री जान्हवी कपूर चांगलीच चर्चेत होती. आता त्यानंतर जान्हवी कपूर तिच्या 'उलझ' चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे. या चित्रपटामध्ये जान्हवी कपूर एका महिला IFS ऑफिसरची भूमिका साकारणार आहे. सध्या तिच्या ह्या आव्हानात्मक भूमिकेची जोरदार चर्चा होत आहे.

जंगली पिक्चर्सने चित्रपटाची निर्मिती केली असून राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक सुधांशू सारिया यांनी दिग्दर्शन केले आहे. सध्या ह्या चित्रपटाचे जोरदार कौतुक केले जात आहे. हटके कथानक असलेल्या ह्या चित्रपटामध्ये जान्हवी कपूर एका आव्हानात्मक भूमिकेत दिसणार आहे. जान्हवीने IFS ऑफिसर सुहाना भाटियाचं पात्र साकारले आहे. ती लंडनमध्ये IFS ऑफिसर म्हणून काम करत असते. ती तिथे एका राजकीय षडयंत्रामध्ये अडकलेली असते. त्यामुळे तिच्या करियरला फार मोठा अडथळा येतो.

सुहानाची IFS ऑफिसर म्हणून निवड झाल्यानंतर, सर्वच लोकं तिची नेपोटिझममुळे निवड झाली आहे, अशी तिच्यावर टीका केली जात आहे. तिला तेथील राजकीय षडयंत्रामुळे कशा पद्धतीने अडकवले जाते, हे आपल्याला पाहायला मिळेल. त्यातून ती स्वत:चा कशी बचाव करते, हे सुद्धा ट्रेलरमध्ये दिसेल. षडयंत्र, कट आणि फसवणुकीच्या जाळ्यात अडकणारी सुहाना या सर्व कचाट्यातून ती कशी बाहेर पडणार, असा प्रश्न ट्रेलर बघितल्यानंतर निर्माण होतो. हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरणार, हे नक्की.

ट्रेलरमुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. जान्हवी कपूरसोबत प्रमुख भूमिकेत गुलशन देवैया, रोशन मॅथ्यू, सचिन खेडेकर, राजेश तैलंग, मियांग चांग, आदिल हुसैन, राजेंद्र गुप्ता, जितेंद्र जोशी अशी तगडी स्टारकास्ट आहे. जान्हवी, गुलशन आणि रोशन यांच्या भूमिकेतल्या वेगवेगळे पैलू ट्रेलरमध्ये बघायला मिळतात. सस्पेन्स आणि थ्रिलर असलेला हा 'उलझ' चित्रपट येत्या २ ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: परळीत मुंडे समर्थकांनी केले आंदोलन..

भयंकर! मुंबईतील प्रसिद्ध रूग्णालयातील डॉक्टरांवर हल्ला; तिघे गंभीर जखमी, VIDEO व्हायरल

Pune Accident: कुंडेश्वर अपघाताची पुनरावृत्ती! चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो उलटला; ८ जण गंभीर जखमी

Winter Hair Care : थंडीमध्ये केस गळणे थांबवण्यासाठी करा हे घरगुती सोपे उपाय

Saturday Rules: शनिवारी केस कापावे की नाही?

SCROLL FOR NEXT