आदित्य सरपोतदार दिग्दर्शित 'मुंज्या' चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा होत आहे. अवघ्या ३५ ते ४० कोटींच्या बजेटमध्ये निर्मित झालेल्या या चित्रपटाचे चाहत्यांकडून कौतुक केले जात आहे. चित्रपटाचे कथानक कोकणातल्या भुताच्या दंतकथेवर आधारित आहे. चित्रपटाच्या कथानकाचे चाहत्यांकडून कौतुक केले जात आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ७ जूनला रिलीज झालेला आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या १७ दिवसांमध्ये कमाईत १०० कोटींचा आकडा गाठला आहे. याबद्दलची माहिती चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी दिलेली आहे.
मराठमोळे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी 'मुंज्या' चित्रपटाचं दिग्दर्शन केले आहे. त्यांनी शेअर केलेल्या पोस्टरमध्ये चित्रपटाने पहिल्या आठवड्यात ३६.५० कोटी, दुसऱ्या आठवड्यात ३४. ५० कोटी, १५ व्या दिवशी ३.३१ कोटी, १६ व्या दिवशी ५.८० कोटी आणि १७ व्या दिवशी म्हणजे तिसऱ्या विकेंडला चित्रपटाने ७.२० कोटींची कमाई केलेली आहे. चित्रपटाने अवघ्या एका महिन्याच्या आतच १०३ कोटींची कमाई केलेली आहे.
दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. "हाच तो माझा पहिला हिंदी थिएट्रिकल चित्रपट ज्याने १०० कोटींची कमाई केलेली आहे. ऐतिहासिक तिसऱ्या शनिवारी आणि रविवारी दिलेल्या प्रतिसादाचे प्रेक्षकहो तुमचे आभार मानतो. तुमच्याशिवाय आम्ही हे करू शकलो नसतो!" अशी पोस्ट आदित्यने इन्स्टाग्रामवर चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या चित्रपटाने अनेक बॉलिवूड चित्रपटांनाही मागे सारलं आहे. अनेक बिगबजेट चित्रपटांवर त्याने मात केली आहे.
'मुंज्या' ही महाराष्ट्राची लोककथा आहे. ह्या लोककथेची ख्याती फक्त राज्यातच नाही तर अवघ्या देशभरामध्ये प्रसिद्ध झाली आहे. सध्या ह्या चित्रपटाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. हा चित्रपट VFX वर आधारित असून भारतातील पहिला CGI (कॉम्प्युटर जनरेटेड इमेजरी) चित्रपट आहे. त्यामुळे या चित्रपटाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. हॉरर कॉमेडी चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत अभय वर्मा, शर्वरी वाघ, मोना सिंग आहेत. तर सुहास जोशी, रसिका वेंगुर्लेकर, भाग्यश्री लिमये आणि शर्वरी वाघ हे मराठमोळे सेलिब्रिटी ही प्रमुख भूमिकेत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.