Munjya Trailer Out Saam Tv
मनोरंजन बातम्या

Munjya Box Office Collection : पाचव्या दिवशीही 'मुंज्या' बॉक्स ऑफिसवर जोमात, कोकणातल्या लोककथेची देशभरामध्ये चर्चा

Munjya 5th Day Box Office Collection : आदित्य सरपोतदार दिग्दर्शित 'मुंज्या' चित्रपटाची सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई सुरू आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासून चित्रपट उत्तम कमाई करत आहे.

Chetan Bodke

आदित्य सरपोतदार दिग्दर्शित 'मुंज्या' चित्रपटाची सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई सुरू आहे. अवघ्या ३० कोटींमध्ये तयार झालेल्या ह्या चित्रपटाचे सर्वच स्तरातून जोरदार कौतुक होत आहे. शर्वरी वाघ आणि अभय वर्मा स्टारर चित्रपट ७ जून रोजी थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासून चित्रपट उत्तम कमाई करत आहे. जाणून घेऊया चित्रपटाच्या पाचव्या दिवसाच्या कमाईबद्दल...

सॅकल्निकच्या अहवालानुसार, चित्रपटाने एकूण पाच दिवसांत २७.५० कोटींच्या आसपासची कमाई केलेली आहे. प्रदर्शाच्या पहिल्या दिवशी ४.२१ कोटी, दुसऱ्या दिवशी ७.४० कोटी, तिसऱ्या दिवशी ८.४३ कोटी, चौथ्या दिवशी ४.११ कोटी आणि पाचव्या ४ कोटींच्या आसपासची कमाई केलेली आहे. चित्रपटाची निर्मिती ३० कोटींमध्ये झालेली आहे. लवकरच चित्रपट निर्मितीचाही आकडा सहज गाठेल, अशी abशक्यता वर्तवण्यात येत आहे.

'मुंज्या' ही महाराष्ट्राची लोककथा आहे. ह्या लोककथेची ख्याती फक्त राज्यातच नाही तर अवघ्या देशभरामध्ये प्रसिद्ध झाली आहे. सध्या ह्या चित्रपटाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. हा चित्रपट VFX वर आधारित असून भारतातील पहिला CGI (कॉम्प्युटर जनरेटेड इमेजरी) चित्रपट आहे. त्यामुळे या चित्रपटाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

हॉरर कॉमेडी चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केले असून चित्रपटाची निर्मिती ‘स्त्री’ चित्रपटाचे निर्माते मॅडॉक फिल्म्सने केली आहे. चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत अभय वर्मा, शर्वरी वाघ, मोना सिंग आहेत. तर सुहास जोशी, रसिका वेंगुर्लेकर, भाग्यश्री लिमये आणि शर्वरी वाघ हे मराठमोळे सेलिब्रिटी ही प्रमुख भूमिकेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik News: देव्हाऱ्याखाली दारूचा साठा सापडला, दृश्य बघून पोलिसही चक्रावले | VIDEO

Face Care: चेहऱ्याला फ्रेश आणि ग्लोईंग ठेवण्यासाठी घरच्या घरी बनवा 'हा' डी-टॅन फेसपॅक

Shocking : संतापजनक! गरोदर महिलेवर सामूहिक बलात्कार; मांत्रिकाचं 'अघोरी' कृत्य

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

Shocking : सरकारी शाळेच्या मुख्याध्यापकाने विहिरीत उडी मारून संपवलं आयुष्य; कोल्हापुरात खळबळ

SCROLL FOR NEXT